9 January 2025 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या EPF on Salary | तुमच्या पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात जमा होणार 2 कोटी 53 लाख रुपये, अपडेट जाणून घ्या Nippon India Mutual Fund | या 3 म्युच्युअल फंड योजना ठरतील मार्ग श्रीमंतीचा, मिळेल 1.02 कोटी रुपये ते 1.27 कोटी रुपये परतावा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा
x

मनसेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; राज ठाकरेंची कारवाई

MNS Aurangabad City Party President Gautam Amrao, MNS Chief Raj Thackeray

औरंगाबाद : ‘आपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत. मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावं मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार आहे,’ असं म्हणत औरंगाबाद दौऱ्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर आता पक्ष विरोधी कारवाई केल्याने मनसे पदाधिकारी गौतम अमराव यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच त्यांचं प्राथमिक सदस्यत्वही काढून घेण्यात आली.

औरंगाबादमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गौतम अमराव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातील अंतर्गत बातम्या पसरवण्याचा संशल गौतम अमराव यांच्यावर होता. तसेच पक्षादेश न पाळल्याने गौतम यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी पक्षाबद्दल चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा दिला होता. पक्षातील अंतर्गत बातम्या फोडल्याचा संशय होता. त्यानुसार, राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. त्या इशाऱ्यानुसारच मनसेचे जिल्हाध्यक्ष गौतम अमराव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

 

Web Title: Story MNS Chief Raj Thackeray sacked Aurangabad City Party President Gautam Amrao.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x