महाराष्ट्र CM फंडाला CSR लागू करावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली
पुणे, २३ एप्रिल: केवळ पीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे २ आठवड्यानंतर केंद्रानं याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं होतं.
कोरोना संकटाचा आपण एकत्रित मुकाबला करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असताना पीएम आणि सीएम रिलीफ फंडाला केलेल्या मदतीत फरक करण्याचं कारण काय, असा सवाल कॉर्पोरेट क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे. त्यानंतर देखील या विषयाला अनुसरून केंद्राकडून राज्यांच्या हितासाठी कोणतंही पाऊल उचलण्यात आलं नाही.
मोदी सरकारवर यावरून देशभरातून टीका झाली होती. विशेष महाराष्ट्रातील भाजपचे सर्व वरिष्ठ नेते महाराष्ट्र सोडून पीएम केअर फंडाला दान करण्याचं आवाहन करताना दिसले आणि त्यांच्या राज्याप्रती किती आस्था आहे ते समोर आलं. मात्र मनसेचे पदाधिकारी महाराष्ट्रावर आमचे नितांत प्रेम आणि आस्था असल्याचं म्हणत केंद्र सरकारविरुद्ध थेट कायद्याच्या लढाईत उतरले आहेत. मनसेच्या पुण्यातील पदाधिकारी रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केंद्र सरकार विरुद्ध थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत महाराष्ट्र सरकारच्या बाजूने उभं राहण्याची ठाम भूमिका घेतली आहे. एका बाजूला मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमिनीवर लोकांना मदत करत आहेत, तसेच कायद्याच्या मार्गातून आपत्तीच्या काळात राजकारण बाजूला ठेवून आम्ही सरकारसोबत असल्याचा संदेश देत आहेत. सदर याचिकेबाबत स्वतः रुपाली पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील CM फंडाला CSR लागू कराव्या यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
आमचे महाराष्ट्रावर नितांत प्रेम,आस्था आहे.
जय महाराष्ट्र ,जय हिंद pic.twitter.com/ggyXfHiobL— Rupalipatilthombare (@Rupalipatiltho1) April 22, 2020
News English Summary: The Central Government has made it clear that only the assistance provided to PM Care will be considered as Corporate Social Responsibility (CSR). The Modi government has said that the amount deposited in the Chief Minister’s Assistance Fund will not be counted in the CSR. It is noteworthy that the Center had explained this after 7 weeks.
News English Title: Story MNS Leader advocate Rupali Patil Thombare filed the suit at court for declaring CM Care Fund as CSR Covid 19 News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH