15 January 2025 5:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

कोरोना रुग्ण वाढत आहेत; धारावीप्रमाणे सरकारी यंत्रणेने कल्याण-डोंबिवलीत पाहणी करावी

Kalyan Dombivli, Covid19, Corona Crisis

डोंबिवली, १० एप्रिल: राज्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी राज्यात १६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,३८० वर पोहचला आहे. गुरुवारी राज्यात कोरोनाचे २२९ नवे रुग्ण आढळले होते.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली धारावी आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. या पार्श्वभूमीवर धारावीत पोलिस स्टेशनबाहेर निर्जंतुकीकरणासाठी पहिला ‘सॅनिटायझेशन टेंट’ उभारण्यात आला आहे. धारावीत कोरोनाने कहर केला आहे. शुक्रवारी धारावीत आणखी ५ रुग्ण आढळले आढळले आहेत. एकूण रुग्ण संख्या २२ वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सध्या धारावी परिसर सील करण्यात आला आहे.

दुसरीकडे कल्याण डोंबिवली देखील कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यानंतर देखील टेस्टिंग लॅब, ट्रेसिंग, उपचार हा फार्मुला औषधाला पण सापडत नाहीये अशी खंत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील बोलून दाखवली आहे. त्या निमित्ताने त्यांनी कोरोना बाधितांचा माग काढण्यात यंत्रणा अपूरी पडत असल्याने, मुंबईतील धारावीत जशी सरकारच्यावतीने पाहणी करण्यात आली तशी कल्याण-डोंबिवलीत देखील करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

 

News English Summary: Kalyan Dombivali has also become a hotspot for Corona patients. Even after this situation testing labs, tracing, treatment formula, medicine can not be found says MNS Kalyan Rural MLA Raju Patil. On that point, he also demanded that government should make search operation of Covid 19 patients in Kalyan-Dombivali like government is doing in Mumbai Dharavi slums where big count of corona infected patients came under medical treatment.

News English Title: Story MNS MLA Raju Patil demanded to implement search COVID19 patients like Dharavi in Kalyan Dombivli News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x