शहरात चिंता वाढली...तबलिगींना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर इतरत्र हलवावे - आ. राजू पाटील
कल्याण-डोंबिवली, २१ एप्रिल: सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना या रोगापासून आपली कल्याण डोंबिवली पण सुटू शकली नाही. यावर मनसेचे आमदार राजू पाटील मोठी चिंता व्यक्त करताना सरकारला देखील विनंती केली आहे. त्यावर सविस्तर बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे की, सध्या कोरोनाबाधित रूग्ण सापडण्यात कल्याण डोंबिवलीचा महाराष्ट्रात तिसरा किंवा चौथा क्रमांक लागत आहे. कल्याण-डोंबिवलीत हा रोग पसरण्यासाठी इथे नाममात्र असलेली आरोग्यसेवा तसेच काही लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. आपण नुकतीच केडिएमसीचे आयुक्त म्हणून सुत्र हाती घेतली असली, तरीही आपण या परिस्थितीतही कोरोनाशी दोन हात करताना जनतेला दिसत आहात.
कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांना लिहिलेल्या लेखी पत्रात राजू पाटील यांनी म्हटलं आहे की, ‘जेव्हा डोंबिवली हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला होता व त्याच सुमारास कल्याणहून रस्त्यावर फिरणाऱ्या साधारण पंचवीस एक लोकांना आपण पाथर्ली येथील BSUP त क्वारंटाइन केल्याचे समजले, तेव्हाच मी सुरूवातीलाच आपणास आधीच धोकादायक होत चाललेल्या डोंबिवलीत रहिवासी भागात अजून बाहेरचे संशयीत रूग्ण आणू नका अशी फोनवर विनंती केली होती.
— Raju Patil (@rajupatilmanase) April 21, 2020
तसेच याच पाथर्ली भागात मागच्याच काही दिवसांपूर्वी कोरोनाचा एक रूग्ण आढळून आला होता, तसेच येथून जवळच असलेला आजदे सागर्ली भाग पण हॉटस्पॉट जाहीर केला आहे, अशातच आज मला समजले की त्यानंतरही काही संशयीत रूग्ण ज्यामध्ये काही तबलिगी यांचा समावेश आहे,असे एकूण १०० च्या वर लोक इथे ठेवले आहेत. हॉटस्पॉट मध्ये आढळून आलेले रूग्ण त्या जागेपासून दूर नेणे अपेक्षित असताना, उलट बाहेरचे संशयीत या शहरात दाट वस्तीच्या ठिकाणी आणणे योग्य नाही व याच गोष्टींची माहिती आजूबाजूच्या परिसरात समजल्यावर लोकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
त्यामुळे आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या डोंबिवलीत या तबलिगींची उपस्थिती जर लोकांमध्ये भीती निर्माण करत असेल व त्यामुळे भविष्यात प्रशासनावर ताण येणार असेल तर या लोकांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर इतरत्र हलवावे ही माझी आपणास विनंती आहे.
News English Summary: In a written letter to the Kalyan-Dombivali Municipal Commissioner, Raju Patil said that when the Dombivali area was becoming a hotspot for corona and around the same time about twenty-five people traveling on the road from Kalyan realized that he had quarantined the BSUP at Patharli, I was already at risk. In the residential area of Dombivali, another outsider suspected Rs Do not na was requested on the phone.
News English Title: Story MNS MLA Raju Patil worried about Kalyan Dombivli Corona crisis and Markaz issue News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH