22 January 2025 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती द्या, ५००० रुपये मिळवा : मनसे

Pakistani, Bangladeshi infiltrators, Raj Thackeray, Sambhajinagar

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती देणाऱ्यांना ५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी मनसेचे पोस्टर लावण्यात आले आहेत. महिन्याभरापूर्वी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कात टाकत हिंदुत्त्वाचा नारा दिला. बेकायदा बांगलादेशींना भारतातून हाकला हीच आमची भूमिका असल्याचे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते.

त्यामुळे मनसे राज्यात आलेल्या घुसखोरांबद्दल अधिक आक्रमक झाली आहे. मुंबई पाठोपाठात मनसेनं औरंगाबादमध्येही ‘घुसखोर हटाओ! देश बचाओ’चा नारा दिला आहे. ‘बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती देणाऱ्यांना मनसे औंरगाबादकडून ५००० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल’, अशा स्वरुपाची पोस्टरबाजी शहरात पाहायला मिळत आहे.

मुंबई पाठोपाठ मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात तिघांना पकडलं होतं. हे तिघे बांगलादेशी असल्याच्या संशयातून मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही धरपकड कार्यकर्त्यांच्या अंगलट आली होती. मात्र आता ‘मातोश्री’च्या अंगणातही पोस्टर लावण्यात आलं आहे. वांद्रे पूर्व भागातही मनसेने घुसखोरांची माहिती देणाऱ्यांसाठी पारितोषिकाची घोषणा केली. मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रेंनी पोस्टर लावलं आहे.

‘घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा! पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकललंच पाहिजे. या मोहिमेत समोर आलेल्या माहितीची शहानिशा करुन सत्यता पटल्यावर माहिती देणाऱ्याच रोख ५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस दिले जाईल. माहिती देणाऱ्याचे नाव या संपूर्ण प्रक्रियेत गुप्त ठेवण्यात येईल’ असं मनसेच्या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

 

 

News English Summery: Maharashtra Navnirman Sena has announced a reward of Rs. 5000 to those who give accurate information about Bangladeshi, Pakistani intruders. Aurangabad posters have been set up in several places. A month ago, Raj Thackeray’s Maharashtra Navnirman Sena slammed the Hindutva slogan. MNS president Raj Thackeray had said a few days ago that it was our role to call illegal Bangladeshis from India. Therefore, the MNS has become more aggressive about the intruders. Mumbai follows MNS in Aurangabad to ‘remove the intruder! Save the country slogan. In the city, posters are seen in the form of ‘Rupees 5000 will be given by MNS Aurangabad to those who give accurate information about Bangladeshi, Pakistani intruders’.

 

Web Title: Story MNS poster stating to reward with Five Thousand the informers who give accurate information about illegal Pakistani and Bangladeshi infiltrators.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x