3 December 2024 11:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

विकृत करूच नये अन केलं तर विकृती प्रमाणे मार सुद्धा खावा; रुपाली पाटील यांचं मनसे समर्थन

MNS Rupali Patil Thombare, Minister Jitendra Awhad, BJP

ठाणे, ०८ एप्रिल: मुंबई: राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. लॉकडाऊनच्या काळातही खुद्द तरुणाला मंत्र्यांच्या बंगल्यात बोलावून ही मारहाण झाल्याने विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावरुन सोशल मीडिया प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी एका तरुणाने ट्विटरला कमेंट करताना ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार’ असं म्हटलं आहे. यामुळे सध्या खळबळ उडाली असून पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे मनसेतील विविध नेते वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसत आहेत. मनसेतील काहीजण याला संविधानाची पायमल्ली म्हणत आहेत तर काहीजण याला जशास तसे प्रतिउत्तर देणं गरजेचं असल्याचं म्हणत आहेत. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करुन जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं समर्थन केलं आहे.

मंत्री, कलाकार किंवा कोणत्याही एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी यांनी केलेल्या पोस्टवर विकृत पणे कमेंट करु नये. तसेच विकृतीची कमेंट केलीच तर विकृतीप्रमाणे मार खावा असं रुपाली पाटील यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारहाण केली असेल तर हे चांगलेच केले. विकृतपणे कमेंट करणाऱ्यांना ठेचलेच पाहिजे असं रुपाली पाटील यांनी फेसबुकद्वारे सांगितले आहे. रुपाली पाटील यांनी थोड्या वेळानंतर ही पोस्ट फेसबुकवरुन डिलीट केली असल्याचे समोर आले. मात्र जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवरुन मनसेतच मनभिन्नता असल्याचे दिसून येत आहे.

 

News English Summary: NCP leader and Home Minister Jitendra Awhad is currently stuck in the lurch. Jitendra Awhad, a youth, has been accused of beating him up by supporters. Writing a post against Jitendra Awhad through social media, the youth is alleged to have beaten you. Due to this, Jitendra Awhad’s name is in the discussion and there has been widespread criticism.

News English Title: Story MNS Rupali Patil Thombare Minister Jitendra Awhad BJP News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x