16 April 2025 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

लोकांना गांभीर्य नाही, आता संचारबंदी हाच उपाय..राष्ट्रवादी व मनसेची मागणी

Minister Jitendra Awhad, MLA Raju Patil, Corona Crisis

मुंबई, २३ मार्च: कोरोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

‘कोरोना’चा प्रसार दिवसागणिक वाढत असून बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत हा आकडा ८९ वर पोहोचला आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनं संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसंच, सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. एकप्रकारे महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. मात्र, सरकारच्या आदेशानंतरही लोक बिनधास्त रस्त्यावर येत आहेत.

मंत्री जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८९ वर पोहचली आहे. मात्र तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नाहीत. मी स्वत: फिरुन हा अनुभव घेत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच लोक ऐकत नसल्यामुळे राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत आता नाही, तर कधीच नाही अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

दरम्यान, परिस्थितीचा अंदाज आल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी चिंता व्यक्त करताना सरकारला संचारबंदीचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आमदार राजू पाटील यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, कारण लोकं अजूनही कोरोना व्हायरस’बाबत गंभीर दिसत नाहीत. म्हणूनच जमावबंदी नको संचारबंदीच लागू करायला हवी. सतत नियमात बदल केल्याने सरकारी यंत्रणा व जनता पण गोंधळली आहे’ असं म्हटलं आहे.

 

News English Summery:  Minister Jitendra Awhad tweeted that the situation in the state was serious. The number of corona virus patients has now reached 89. However, people do not take it seriously. Jitendra Awhad said that I am experiencing this by myself. Similarly, Jitendra Awhad has urged Uddhav Thackeray that communication is the only solution in the state as people are not listening. Meanwhile, MNS MLA Raju Patil has expressed concern over the situation and demanded the government to take a decision on the ban. MLA Raju Patil has tweeted that the government should take some concrete decision as people are still not serious about the corona virus. Therefore, mobilization should not be imposed. It is said that the government system and the people are also confused by the changes in the rules.

 

News English Title: Story NCP Leader Jitendra Awhad and MNS MLA Raju Patil has requested CM Uddhav Thackeray impose ban communication state News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या