5 November 2024 5:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना मुंबईला जाण्यास मनाई

kalyan Donbivli, Covid 19, Corona Crisis

कल्याण-डोंबिवली, ५ मे: कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरच्या हद्दीतून मुंबई-ठाण्यात कामानिमित्त जाणाऱ्यांना पुन्हा कल्याण-डोंबिवली आणि उल्हानगरात प्रवेश मिळणार नाही. कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली आणि उल्हानगरातून मुंबईला कामासाठी जाणाऱ्यांना पुन्हा शहरात प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेशच या दोन्ही पालिकांच्या आयुक्तांनी काढले आहेत. येत्या ८ तारखेपासून हे आदेश लागू करण्यात येणार आहेत.

महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व कामानिमीत्त मुंबईत ये-जा करणाऱ्या शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना मुंबईला जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ८ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी होणार असल्याचं समजतंय. मुंबईत कामानिमीत्त जाणाऱ्या व डोंबिवलीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या अनेक व्यक्तींना गेल्या काही दिवसांमध्ये करोनाची बाधा झाल्याचं दिसून आलंय. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे.

कल्याण-डोंबिवलीतील करोनाबाधितांची संख्या २१३वर पोहोचली आहे. सध्या करोनावर १४२ जण उपचार घेत आहेत. यातील ६० बाधित हे मुंबईत दररोज प्रवास करणारे आहेत. त्यामुळे मुंबईला प्रवास करणाऱ्यांकडूनही करोनाचा फैलाव होत असल्याने पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी हे आदेश जारी केले आहेत. कल्याण-डोंबिवली, टिटवाळ्यातून दररोज सुमारे अडीच हजार कर्मचारी मुंबईला कामाला जातात. यात सरकारी कर्मचारी, खासगी कर्मचारी आणि पत्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्वांची त्यांच्या त्यांच्या अस्थापनांनी कामाच्या ठिकाणीच हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

मुंबईत कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली संपूर्ण माहिती ई-मेलद्वारे महापालिकेला पाठवण्यात यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. केल्या २४ तासांत महापालिका क्षेत्रात ११ नवीन करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.

 

News English Summary: Government and private employees residing in the municipal area and coming and going to Mumbai for work are prohibited from going to Mumbai. It is understood that this rule will be strictly enforced from May 8. In the last few days, many people going to work in Mumbai and living in Dombivali have been affected by the corona. Against this background, Municipal Commissioner Dr. This decision has been taken by Vijay Suryavanshi.

News English Title: Story no Permission For Traveling To Mumbai For Employees Living In KDMC Area To Avoid Covid 19 Virus Thread News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x