राज ठाकरे म्हणाले होते, जेव्हा संकट येईल तेव्हा परप्रांतीय पळ काढतील; आज तेच चित्र?

मुंबई, २१ मार्च: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पुणे, मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड ही चार शहरं ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या भितीमुळे परप्रांतीय गावाकडे निघाले आहेत. मुंबई, पुण्यामध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी आपल्या गावाकडे जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईतील दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची गर्दी पहायला मिळाली. तर तीच परिस्थिती पुणे रेल्वे स्थानकावर देखील आहे.
पुण्यात राज्यातील विविध भागांमधील नागरिक येत असतात. तसेच पुण्यात कामानिमित्त राहणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. राज्य सरकारच्या आदेशामुळे सर्व आस्थापने, दुकाने बंद झाल्याने कर्मचारी आपल्या मूळगावी जाण्यास निघाले आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र. pic.twitter.com/Ka0ccJHtPr
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) March 20, 2020
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामानिमित्त आलेले आहेत. या परप्रांतियांना देखील कोरोना विषाणूमुळे धडकी भरली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या भितीमुळे मुंबईमध्ये राहणाऱ्या परपांतियांना त्यांच्या कुटुंबियांनी फोन करुन घरी बोलावले आहे. कोरोनाच्या भितीमुळे ते आपल्या गावाकडे निघाले आहेत. लोकमान्य टिळक टर्निनसवर गावाकडे निघालेल्या परप्रांतियांची एकच गर्दी पहायला मिळाली. काही जण गाड्यांची वाट पाहत बसले आहेत. तर अनेकांनी तिकीट काढण्यासाठी गर्दी केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारने गर्दी करु नका, प्रवास टाळा, घरामध्येच थांबा असे आवाहन केले आहे. तरी सुध्दा नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन करताना दिसत नाही. कोरोनाच्या भितीमुळे मुंबई, पुण्यामध्ये राहणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी केली आहे. एकमेकांना धक्का मारत कसेबसे गाडीमध्ये चढून आपल्या घरी सुखरुप पोहचण्यासाठी हे प्रवासी प्रयत्न करत आहे. गाड्यांना प्रचंड गर्दी आहे बसायला जागा नाही तरी सुध्दा हे प्रवासी उभे राहून प्रवास करत आहे.
Mumbai: People in large numbers at Lokmanya Tilak Terminus wait to board their respective trains. A passenger says, “There are so many people on trains that I didn’t get a seat despite having a confirmed ticket. My parents have asked me to return because of #coronavirus“. pic.twitter.com/YOF7UtWIzm
— ANI (@ANI) March 21, 2020
विशेष म्हणजे राज्यातील भूमिपुत्रांच्या नोकरीवरून आणि हक्कांवरून राजकारण पेटल्यास महाराष्ट्रातील नेत्यांवर आगपाखड करणारे परप्रांतीय लोंढे नोकऱ्यांवर लात मारून पळ काढताना दिसत आहेत. यावेळी त्यांना रोजगार देखील सतावत नसून प्राण वाचवणे महत्वाचे झाले आहे आणि सर्वकाही सुरळीत झाल्यावर ते पुन्हा परततील असंच दिसतं. मात्र, संसर्ग प्रवासात किंवा ते मूळचे ज्या राज्यातील आहेत तेथे देखील कोरोना लागण झाल्या आहेत याचा देखील त्यांना विसर पडला आहे. मात्र यावरून मनसे अध्यक्ष यांनी काही वर्षांपूर्वी केलेला राजकीय ठोकताळा पुन्हा सिद्ध झाला आहे असंच म्हणावं लागेल.
News English Summery: The government ordered the closure of four cities – Pune, Mumbai, Nagpur and Pimpri-Chinchwad – by March 31 to prevent the outbreak of the Corona virus. In such a situation, the coroners’ terrors have left for the village. Workers in Mumbai, Pune, have started moving to their village. Due to this, there was a rush of commuters at Dadar, Lokmanya Tilak Terminus in Mumbai. The same is the case at Pune Railway Station. Mumbai has a large number of traditional artisans. These species are also threatened by the corona virus. The outbreak of the corona virus is on the rise. Due to the fear, the family members in Mumbai have been called home by their families. They are on their way to their hometown because of the horror of Corona. On the Lokmanya Tilak Turninas, a single crowd of the parishioners heading towards the village was seen. Some are waiting for the trains. Many have rush to get tickets.
News English Title: Story people in large numbers at Mumbai and Pune railway station wait to board their respective trains News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC