22 December 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

देवदर्शनावरुन परतताना स्कॉर्पिओ गाडीची ट्रकला धडक, ६ जणांचा मृत्यू

Scorpio car and truck accident in Chandrapur

चंद्रपूर : गाडी वेगावर नियंत्रण ठेवा नाहीतर जीवाशी मुकाल अशा कितीही सुचना दिल्या तरी गाड्यांचा वेग काही कमी होत नाही. चंद्रपूरमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या एका कारला भीषण अपघाता झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चंद्रपूरमधील मूल तालुक्यातील केसलाघाट इथे हा भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील भोयर आणि पाटील कुटुंबीय देवदर्शानासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे गेले होते. रात्री उशिरा ही मंडळी परतत असताना भरधाव येत असलेल्या स्कार्पिओने नादुरुस्त ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यात चंद्रपूरच्या बाबूपेठ परिसरातील भोयर आणि पाटील कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि २ वर्षांच्या लहान बालकाचाही समावेश आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील केसलाघाट ते नागाळा या दरम्यान हा अपघात झाला.

ही घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. स्कार्पिओ क्रमांक एमएच ३४ एबी ९७८६ या गाडीनं चंद्रपूरच्या बाबूपेठमधील भोयर आणि पाटील कुटुंबातील सदस्य प्रतापगड येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शनाहून परताना केसलाघाट ते नागाळा दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेला एमएच ३४ एपी २५३३ या ट्रकला जोरदार धडक दिली. दुर्दैवी अपघाताची माहिती कळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. स्थानिकांना अपघातील जखमींना वाचण्याचा प्रयत्न केला.

 

Web Title: Story Scorpio car and truck accident in Chandrapur 6 peoples died in accident News.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x