22 April 2025 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील, हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे

MP Sanjay Raut, Shivsena

मुंबई, २६ एप्रिल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नामनियुक्त विधान परिषद सदस्यतेबाबत राज्यपालांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ द्या. पण घटना आणि कायद्याची चौकट कोणालाच मोडता येणार नाही. राजभवनाच्या भिंतीवर कितीही डोके फोडले तरी २७ मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडसावले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातील रोखठोक या लेखातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात राजकारण रंगलं आहे. विधिमंडळाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांना २७ मेच्या आधी कुठल्याही एका सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्यपाल कोट्यातील दोन रिक्त जागांपैकी एका जागेसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, शिफारशीला १५ दिवस उलटूनही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. राज्य संकटात असताना येथे अराजकाची आग लागावी अशी त्यांची इच्छा आहे. याकामी विरोधी पक्ष राज्यपाल या संस्थेला बदनाम करीत आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि संघ प्रचारक आहेत. पण आज ते फक्त राज्यपाल आहेत. विरोधी पक्षाचे नेते राजभवनात उठसूठ जातात आणि राज्यपाल हे फक्त भाजपचेच नेते आहेत अशा आविर्भावात भेटतात. त्यामुळे राज्यपालांची प्रतिमा खराब होत आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

 

News English Summary: Let the Governor take whatever decision he wants regarding the nominated Legislative Council membership of Chief Minister Uddhav Thackeray. But no one can break the framework of events and law. No matter how many heads are smashed on the wall of Raj Bhavan, the government will remain the same after May 27 and Chief Minister Uddhav Thackeray will remain. Shiv Sena MP Sanjay Raut has slammed the BJP for keeping this in mind. Shiv Sena’s mouthpiece has targeted BJP in this article.

News English Title: Story Shivsena MP Sanjay Raut criticized opposition party leaders of Maharashtra News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या