15 November 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

नातवासाठी रक्त शोधत भटकणाऱ्या आजोबाला पोलिसांनी पकडले; पण त्यांनीच रक्त मिळवून दिले

Corona Crisis, Corona Virus, Maharashtra Police

सोलापूर, २८ मार्च: महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यापासून मुंबई पोलिसांनी शहरात कडक कारवाई सुरू केली आहे. २० ते २६ मार्चपर्यंत संपूर्ण शहरात अटक केलेल्यांची संख्या २८९वर पोहोचली आहे. २२ आरोपी अद्याप हाती न लागल्याने पोलिसांचा तपास सुरू आहे. तर आतापर्यंत जामीन मिळालेल्यांची संख्या १७६ आहे. या धावपळीत एका करोना संशयितास ताब्यात घेऊन तातडीने रुग्णालयात रवाना करण्याचे कामही पोलिसांनी केले आहे.

दुसरीकडे या लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उपमुख्यमंत्र्यांच्या बातामतीत घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी बारामती शहरातील जळोची गावात आणि काटेवाडी येथे १० पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. या हल्लामध्ये पोलिस जखमी झाले आहेत.

मात्र सोलापुरात वेगळाच किस्सा समोर आला आहे. सोमवारी दशरथ जाधव (चुंगी) यांच्या पत्नीने चपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळाला जन्म दिला़ जन्मत:च बाळ कमी वजनाचे भरले, त्यामुळे तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. मंगळवारी या बाळाला कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तपासणीनंतर बालरोग तज्ज्ञांनी बाळाच्या शरीरात रक्ताची कमतरता असून, त्याला तातडीने रक्त पुरवठा करावा लागेल, असा सल्ला दिला.

त्याच दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली होती. बाळाचे आजोबा रमाकांत जाधव रात्री रक्तपेढीतून रक्त (प्लाज्मा) आणण्यासाठी दुचाकीवरून बाहेर पडले़ सात रस्ता येथे पोलिसांनी त्यांना हटकले आणि ओरडा देखील खावा लागला. त्यानंतर आजोबांना माघारी दवाखान्यात परतण्याशिवाय पर्याय नव्हता. तिकडे बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक बनत होती.

मात्र दुसऱ्या दिवशी ते पुन्हा रक्ताच्या शोधात निघाले आणि थेट बंदोबस्तावरील पोलिसांना स्वतःची व्यथा सांगितली. त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांनी आपल्यासोबत दुचाकीवर घेतले. दमाणी रक्तपेढीपर्यंत नेले, रक्ताची पिशवी घेऊन त्यांना कुंभारीच्या अश्विनी रुग्णालयात आणून सोडले. पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीचे अनोखे दर्शन आजोबांना घडले. बाळाला जीवदान मिळाले. पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवल्याने निराश झालेल्या जाधव कुटुंबीयांना त्याच पोलिसांनी दाखवलेली माणुसकी सुखावून गेली़ याबाबतची माहिती मिळताच रूग्णालयातील नातेवाईकांनी पोलिसांचेही आभार मानले.

 

News English Summary: However, a different story has come up in Solapur. Dasaratha Jadhav (Chungi) ‘s wife gave birth to a baby at a primary health center in Chapalgaon on Monday. After the baby was taken to Ashwini Rural Hospital in Kumbhari on Tuesday, a pediatrician suggested that the baby’s body was lacking in blood and that he would need an urgent blood supply. But the next day, they went in search of blood again and told the police of the incident directly. Then two policemen on duty took a bike with them. Damani was taken to a blood bank, took a bag of blood and brought him to Ashwini Hospital in Kumbhari. The grandfather of this humanity was shown to the grandfather by the police. The baby got life. The relatives of the hospital also thanked the police when they learned that the humanity shown by the same police had disappointed the Jadhav family, who were frustrated by the police’s display of the law.

News English Title: Story Solhapur Police who got police beat him save his grandson News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x