15 November 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

भाजपचे 'घे डबल' नेते म्हणतात, कोरोनाच्या रुग्णांवर तपकीर म्हणजे औषध

tapkir, Corona Virus, BJP Leader Rajendra Nagwade

अहमदनगर, ११ मार्च: जुन्या काळात ग्रामीण भागातील महिला व पुरुष तपकीर ओढायच्या. तपकीरीला उग्र वास असतो. त्यामुळे करोनासारखा व्हायरसही तेथे राहू शकत नाही. करोनाच्या लागण झालेल्या रुग्णांचा या तपकीरीचा औषध म्हणून उपयोग होऊ शकतो का याचा अभ्यास करावा, असे आवाहन श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.

समाज माध्यमांवर व्हायरल झालेली क्लिप क्लिप आपलीच असल्याची कबुली नागवडे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. त्यात तपकीरीचा उग्र वास खरोखरच कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी फायद्याचा ठरु शकतो असा विश्वास नागवडे यांनी व्यक्त केला आहे.

मुळात “तपकीर” म्हणजे तंबाखूच्या वाळलेल्या पानांची भुकटी होय. ही भुकटी बारीक वस्त्रातून गाळली जाते. नंतर ही भुकटी लोखंडी भांड्यात तीन ते चार दीवस भिजत ठेवली जाते. या क्रियेमुळे भिजवलेली भुकटी आंबते. पुन्हा ती कडक उन्हात वाळवली जाते. मग यामध्ये वाळा, गुलाब, कस्तुरी, केवडा यांसारख्या अत्तरात मिसळून सुगंधित केली जाते. बहुतेक हौशी लोकांकडे तर या तपकिरीच्या सोन्या चांदीच्या नक्षीदार डब्या आढळतात. पण जरी तपकीर नाकाने ओढली असली तरी गुणधर्म मात्र तंबाखूचेच असल्याने ती शरीराला हानिकारकच असते. कित्येकांना यामुळे नाकाच्या कॅन्सरला सामोरे जावे लागले आहे. यासोबतच हाय ब्लड प्रेशरचा धोकाही उद्भवण्याचे चान्सेस असल्याने ते नुकसान दायकच मानले आहे.

वास्तविक चीनहून जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसवरील उपचार जगभरातील शास्त्रज्ञ शोधत आहेत. लंडनच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसची लस तयार केल्याचा दावा केला आहे. या लसीची स्वत:वर चाचणी करून घेणाऱ्याला लाखो रुपये दिले जाणार आहेत.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाइटचॅपेलमधील क्विन मेरी बायोएंटरप्रायझेस इनोव्हेशन सेंटरने (Queen Mary BioEnterprises Innovation Centre) कोरोनाव्हायरसविरोधातील लसीच्या चाचणीसाठी २४ लोकांना बोलवलं आहे. जो कोणी या लसीची चाचणी स्वत:वर करून घेईल, त्याला ३,५०० पाऊंड म्हणजे तब्बल ३ लाख रुपये दिले जाणार आहेत. मात्र त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे, यासाठी त्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसने संसर्ग करून घ्यावा लागेल.

 

News English Summery: In olden times women and men in rural areas used to wear brown. Brown has a foul odor. So even a virus like Corona cannot stay there. Rajendra Nagvade, president of the Nagvade Co-operative Sugar Factory in Shrigonda taluka, and BJP leader, have appealed to study whether coronary infected patients can use this brownie as medicine. Nagwade has confessed to the media that the clip has gone viral on social media. Rajendra Nagwade believes that a strong odor of brown can actually be beneficial in eliminating the corona virus.

 

Web News Title: Story tapkir may help to fight against Corona Virus claims BJP leader Rajendra Nagwade from Ahmednagar.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x