23 February 2025 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कोरोना आपत्ती: हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधांच्या पुरवठ्यावरून ट्रम्प यांचा भारताला इशारा

Covid19, Corona Crisis, US President Donald Trump

वॉशिंग्टन डीसी, ७ एप्रिल: अमेरिकेत कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी भारताकडून औषध पुरवण्याची अपेक्षा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘जर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा पुरवठा केला नाही तर अमेरिका जशास तसे उत्तर देईल.’

व्हाइट हाउसमधील निकटवर्तीयांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘आतापर्यंत भारताने अमेरिकेसोबत चांगला व्यवहार केला. यावेळीही ते औषधांच्या ऑर्डरवर बंदी घालतील असं मला वाटत नाही.’ ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘मी असं ऐकलं नाही की, त्यांचा (पंतप्रधान मोदी) हा निर्णय आहे. मला माहीत आहे की, इतर देशांसाठी त्यांनी हे औषध देण्यास बंदी घातली आहे. माझं त्यांच्याशी काल बोलणं झालं. आम्ही सकारात्मक बोललो आणि भारताचा अमेरिकेसोबत नेहमी चांगलाच व्यवहार राहिला आहे.’

कोरोना व्हायरसच्या उपचारांमध्ये हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या गोळया प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी शनिवारी मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली, त्यावेळी या औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्याची विनंती केली होती. पण सोमवारी वॉशिंग्टनमध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन गोळयांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले नाहीत तर, जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली.

दरम्यान, पॅरासीटेमोल औषधांच्या निर्यतीवर निर्बंध कायम आहेत. भारताने तडकाफड़की हे निर्बंध का उठवलेत? हे स्पष्ट झालेले नाही. पण यामागे अमेरिकेचा दबाव आहे असे सरकारी सूत्रांनी सांगितले. शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली होती.

 

News English Summary: The Corona virus crisis is rapidly increasing in the United States. US President Donald Trump, who is expecting India to supply medicines for Corona patients, reiterated his demand. Donald Trump told the media, “If India does not supply Hydroxychloroquine, the US will respond as such.”

 

News English Title: Story US President Donald Trump again urged for help from India PM Narendra Modi for supply of Hydroxychloroquine Corona Crisis Covid19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x