22 January 2025 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

ठाकरे सरकार बरखास्त करा | याचिका फेटाळत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना झापले

Supreme Court, dismisses a plea, Remove Uddhav Thackeray

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात होती. तशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती याचिका आज (१६ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार हटवावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावेळी सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांला चांगलेच फटकारले. तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहित आहे का, असे विचारत सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिका कर्त्यांना सुनावले आहे. दिल्लीतील ३ जणांनी ही याचिका दाखल केली होती.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. दिल्लीतील तीन रहिवाशांनी ही याचिका दाखल केली होती. राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महा विकास आघाडी सरकारला बरखास्त करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली.

रिषभ जैन, गौतम शर्मा आणि समाजसेवक विक्रम गहलोत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारला बरखास्त करावे, अशी मागणी केली होती. “तुम्ही राष्ट्रपतींना विचारा,” असे सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना सांगितले आहे. “महाराष्ट्र किती मोठा आहे हे आपणास ठाऊक आहे,” अशी याचिका फेटाळून लावताना मुख्य न्यायाधीशांनी म्हटले.

महाराष्ट्र राज्य किती मोठे आहे, अशी विचारणाही सरन्यायाधीशांनी केली. दरम्यान राष्ट्रपतींकडे ही मागणी करण्याचे स्वातंत्र्य असल्याची कोपरखळीही सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला या निमित्ताने लगावली. याचिकाकर्त्यांने केवळ मुंबईमधील घटनांचा उल्लेख करून राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी केली होती. त्यावर “महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? केवळ मुंबईतील घटनांवरून सर्व महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन कसे लावता येईल, असा सवाल करत सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले आहे.

 

News English Summary: The Supreme Court today dismissed a petition seeking a direction for the removal of the Uddhav Thackeray-led government in Maharashtra and President’s Rule in the state. Cancelling the request, a bench led by Chief Justice of India SA Bobde said, “You you at liberty to approach the President, don’t come here.” The Nationalist Congress Party (NCP) and the Congress are the alliance partners of Mr Thackeray’s Shiv Sena in Maharashtra.

News English Title: Supreme Court dismisses a plea seeking direction to remove Uddhav Thackeray led government from Maharashtra News updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x