5 November 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

आज मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

Supreme court of India, hearing, Maratha reservation

नवी दिल्ली, ७ जुलै : मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याचे उत्तर आज मिळणार आहे. त्याचबरोबर मागच्या वेळी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला होता. परंतु सोबतच याचे भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असेही सांगितले होते. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

४ जुलै रोजी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी काय तयारी केली याचा फेर आढावा घेण्यात आला होता. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी, मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, इत्यादी उपस्थित होते.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या आरक्षण धोरणामूळे ओबीसी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. अकोला येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामूळे २०१७ पासून ओबीसीचे अकरा हजार विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

देश पातळीवरील ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऑधर बॅकवर्ड क्लासेस’नी ही आकडेवारी जाहीर केली. ‘नीट’द्वारे प्रवेशामध्ये ओबीसींचे २७ टक्के आरक्षण दिले नाही. भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरूस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, नीटमार्फत होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसींचे आवश्यक आरक्षण २०१७ पासून कमी केले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील सर्वसामान्य विद्याार्थी वंचित राहिले आहेत, असे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

 

News English Summary: An important hearing regarding Maratha reservation will be held in the Supreme Court today. The question of whether the Maratha reservation case will go to a large bench of five justices will be answered today.

News English Title: Supreme court of India hearing on Maratha reservation today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x