22 November 2024 12:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सुषमा अंधारेंनी शिवतीर्थ भाषणातून गाजवलं, तर त्या गावागावात शिवशक्ती-भीमशक्ती एकीचा वणवा पेटवतील, सुरुवात अंधेरी पूर्वेतून कारण?

Sushma Andhare

Sushma Andhare | शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी शिवसैनिकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला तो शिवसेनेत नव्याने आलेल्या सुषमा अंधारे यांना हे पाहायला मिळलं. पण शिवसेनेला हवा असलेला भीमशक्तीचा चेहरा आज मिळाला आहे असं बोललं जातं आहे. पण विषय विषय इतकाच आहे का? नाही कारण त्या आगामी निवडणुकीत मोलाची भूमिका निभावू शकतात, ते ही संपूर्ण राज्यापासून ते मुंबई पर्यंत असं म्हणावं लागेल.

नारायण राणेंची कुंडली काढली :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापुढे दहा वर्षे लोटांगण घालून आमदार, खासदार आणि महसूल मंत्रीपद मिळविले. स्वत: च्या लाभाखेरीज त्यांना काही दिसत नाही, असे टीकास्त्र अंधारे यांनी सोडले. राणे यांच्या मुलांचा उल्लेख त्यांनी ‘ वाह्यात बाजारबुणगे’ असा केला.

राष्ट्रवादीतून आलेले किरण पावसकर :
किरण पावस्कर दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांचे हिंदूत्व कुठे गेले होते, असा सवाल करीत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बंडखोर नेत्यांवर टीका केली आणि त्यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे यांच्यामागे एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले.

ईडीमुळे या नेत्यांना हिंदूत्व आठवले :
प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे आदी त्यांच्या जागा भाजपला देण्याची हिंमत दाखवतील का, असा सवाल केला. ईडीमुळे या गटातील नेत्यांना हिंदूत्व आठवले आहे. ठाकरे यांनी कधीच हिंदूत्व सोडले नाही. दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी पोटनिवडणुकीस उभ्या राहिल्या असताना शिंदे गटाने त्यांना पाठिंबा देण्याऐवजी भाजपला जागा दिली. या नेत्यांना हिंदूत्वाचे काहीही सोयरसुतक नाही व शिवसेना कार्यकर्त्यांची काळजी नाही.

सर्व धर्माचा आदर करणारी हिंदू धर्माची व्याख्याच मांडली :
सुषमा अंधारे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांनी हिंदू धर्मातील कोणत्या ग्रंथात दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा हे सांगितले आहे हे सांगावे, असे आव्हान आपण शिंदे गटाला देत आहोत. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अनेक मुस्लिम आज शिवसेनेच्या भूमिकेच्या जवळ येत असल्यामुळेच अनेकांना त्रास होत आहे, असेही अंधारे म्हणाल्या.

शिवशक्ती आणि भीमशक्ती :
शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र असावी अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी रामदास आठवलेंशी संवाद केला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता सुषमा अंधारे यांची वक्तृत्व शैली ही अत्यंत उजवी आहे. तसेच शिवसेनेला एखाद्या कट्टर ‘भीमशक्ती’चा पाठिंबा असलेल्या कट्टर नेत्याची गरज होती. सुषमा अंधारे यांच्यात तो असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेनेत त्यांना फायरब्रॅड नेत्या म्हणून गावागावात दौरे करून ‘भीमशक्ती-शिवशक्ती’ एकत्र आणून बंडखोरांविरोधात राजकीय वणवा पेटविण्यास प्रोत्साहन दिल्यास उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीत चमत्कार करतील असं राजकीय तज्ज्ञ मत व्यक्त करत आहेत.

अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुक :
कारण आज शिवसेनेकडे ‘भीमशक्ती’ची महिला नेता असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत सुद्धा भीमशक्तीचा निळा जनसागर स्वतःकडे खेचता येईल. विशेष म्हणजे मुंबईत होऊ घातलेल्या अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत त्या महत्वाच्या ठरू शकतात, कारण या मतदारसंघात आंबेडकरनगर, साळवेनगर, सागबाग भीमनगर ते मरोळ येथील दुर्गापाडा येथे मोठी भीमशक्ती असलेली व्होटबँक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना कोणती जवाबदारी देणार ते पाहावं लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sushma Andhare Dasara Melava 2022 Speech check details 06 October 2022.

हॅशटॅग्स

#Sushma Andhare(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x