8 September 2024 7:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

राज्यभर दूध दरवाढीवरुन आंदोलक रस्त्यावर, हजारो लिटर दूध रस्त्यांवर ओतले

Swabhimani Shetkari Sanghatna, Milk Tankers, Milk Rates

कोल्हापूर, २१ जुलै : राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. तर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील अकोलमधील नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तर सांगलीत महामार्गावर दूध ओतून सकाळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. दूध खरेदी दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी भाजपनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु केले आहे. कोल्हापूर, सांगलीत आज दूधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले तर काही ठिकाणी दुधाचा अभिषेक करण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी मंगळवारी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये वाढ मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनास सुरुवात झाली आहे. नगरच्या अकोले तालुक्यातील अनेक गावात आंदोलन केलं जात असून दगडाला दुग्धाभिषेक घालत हमीभाव मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. तर नाशिकमधील चिंचखेड गावात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शिवमंदिरात दुग्धाभिषेक घालत आंदोलनास सुरुवात केली.

 

News English Summary: The agitation has come directly to the streets over the milk price hike in the state. The milk agitation was started by anointing the idol of Kalbhairavnath with milk at Nandani in Kolhapur district.

News English Title: Swabhimani Shetkari Sanghatna Supporters Attack Milk Tanker News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Raju Shetty(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x