23 February 2025 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राज ठाकरेंची भेट

Loksabha Election 2019, Raju Shetty, Raj Thackeray

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजप बहुमताने पुन्हा देशात सत्तेत आली आहे. त्यात राज्यात भल्या भल्या दिग्गजांचे पराभव झाले आहेत. मात्र असेच पराभव देशभरातील दिग्गज नेत्यांचे झाल्याचे देखील सिद्ध झाले आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाळा संपताच विधानसभा निवडणुका लागणार असल्याने विरोधी पक्षांकडे फारच कमी वेळ असणार आहे. त्यामुळे आतापासूनच अनेकांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.

त्याच धर्तीवर आवाज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. दरम्यान या भेटीमागील अधिकृत माहिती देण्यात आली असली तरी लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक हेच मुख्य कारण असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे आणि त्यामुळे राज्यात काँग्रेस वगळून इतर पक्षांनी एकत्र येऊन चाचपणीस सुरुवात केल्याचे समजते. त्यातीलच आजची ही भेट असावी असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी काढला आहे.

राजू शेट्टी हे शेतकरी आंदोलनातील नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत आणि काही महिन्यांपासून मनसेने देखील शेतकऱ्यांशी संबंधित विषयाला अनुसरून राज्यभर अनेक आंदोलनं केली आणि ती यशस्वी देखील केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही शक्यता या दोन दिग्गज नेत्यांनी पडताळून पाहण्यास सुरुवात केल्याचा अंदाज बांधण्यात येतं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Raju Shetty(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x