23 April 2025 6:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
x

कोरोना नियंत्रण उपाय, मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यात टास्कफोर्स नियुक्त होणार

Task Force, Maharashtra, Covid 19

मुंबई, २ जुलै : महाराष्ट्रात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. काल एका दिवसात राज्यात कोरोनाच्या तब्बल 5 हजार 537 नव्या रुग्णांची भर पडली, तर 198 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 80 हजार 298 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 8 हजार 053वर पोहोचला आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होतेय. मुंबईत काल दिवसभरात 1 हजार 511 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, त्यामुळे येथील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 78 हजार 708वर पोहोचली आहे. तसेच एका दिवसात 75 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोनाबळींचा आकडा 4 हजार 629 इतका झाला आहे.

दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क नियुक्त केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक जिल्हात नियुक्त करण्यात येणार्‍या या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश करण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे आणि त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर हा टास्कफोर्स काम करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात असे टास्क फोर्स नियुक्त करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यत आल्या आहेत.

 

News English Summary: This task force will work at the district level to control corona virus. Instructions to appoint such task force in each district have been given to all the District Collectors of the State.

News English Title: Task force will work at the district level to control corona virus News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या