मी पक्ष सोडला म्हणून थोरातांना संधी मिळाली, त्यांची कर्तबगारी काय? - विखे पाटील
मुंबई, २० जून : राज्यात सत्ता स्थापन होऊन सहा महिने लोटले आहेत. राज्यात सत्तेत सहभागी असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. त्यावर लगेच पडद्या पडला. मात्र, यावरून भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. “स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार झाले असून, मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्ष पद मिळाले. त्यांची स्वतःची कर्तबगारी काय?”, अशी टीका विखे पाटील यांनी केली.
महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असलेल्या बातम्या सतत येत असतात. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सारंकाही आलबेल असल्याचं थोरातांनी स्पष्ट केलं होतं. मात्र तरीही, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या विखेपाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेत्यांवर त्यांनी आरोप केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्षपद मिळालं. थोरातांची स्वतःची कर्तबगारी काय? थोरात म्हणजे दिशा हरवलेला माणूस आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी अशी कोणती कर्तबगारी दाखवली. राज्यातील जनतेच्या प्रश्नासाठी बैठक होत नाही, तर आपापसातील वाद मिटवण्यासाठी बैठका होत आहे. काँग्रेसला इतकी लाचारी का करावी लागत आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार झाले आहेत. राज्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे,” अशी टीका विखे पाटील यांनी केली.
शिवसेनेविषयी विखे पाटील यांनी भाष्य केलं. “राज्यात कोरोनासारखं मोठं संकट असताना राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. कोणताही निर्णय घेताना सरकारमधील तिन्ही पक्षात समन्वय नाही. राज्य सरकारच आज संभ्रमात आहे. मातोश्रीचा रिमोट आता शिवसेनेच्या हातात राहिलेला नाही. सत्तेच्या वाटमारीत शिवसेनेचं मोठं नुकसान होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही मोठी फरफट होताना दिसत आहे. त्यामुळे आता सत्तेत राहायचं की नाही याचा शिवसेनेनं विचार करण्याची वेळ आली आहे”, असंही विखे पाटील म्हणाले.
News English Summary: Discussions started a few days back that the ruling Congress party was unhappy with the state. Immediately the curtain fell on it. However, BJP leader Radhakrishna Vikhe Patil has targeted the Congress party. The Congress leaders are helpless for their own selfish ends and Balasaheb Thorat got the post of president as I left the party. What is their own duty? Such criticism was made by Vikhe Patil.
News English Title: The Congress leaders are helpless for their own selfish ends and Balasaheb Thorat got the post of president as I left the party News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON