15 November 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

मागील २४ तासात ७ हजार ७१७ कोरोना रुग्णांची नोंद, तर २८२ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, २८ जुलै : महाराष्ट्रात १० हजार ३३३ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत २ लाख ३२ हजार २७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ७ हजार ७१७ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता ५९.३४ टक्के इतका झाला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये २८२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर ३.६२ टक्के झाला आहे.

दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या १ लाखांच्या पुढे गेला आहे. मात्र गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ६८ दिवसांवर आला आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईकरांची हर्ड इम्युनिटी वाढल्याची आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे.

मुंबई महानगरपालिका, नीती आयोग आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनं शहरात सेरो चाचणी केली. त्यातील पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी आणि इतर भागांमधील ६ हजार ९३६ जणांचे अहवाल घेण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली. झोपडपट्टी भागातील ५७ टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. तर इतर भागातील १६ टक्के व्यक्तींच्या शरीरात आढळल्या आहेत.

 

News English Summary: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 391440. Today,newly 7717 patients have been tested as positive. Also newly 10333 patients have been cured today, totally 232277 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 144694.

News English Title: The Current Count Of Covid19 Patients In The State Of Maharashtra Is 391440 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x