RSS'मुळे धारावी कोरोनामुक्त मग नागपुरात संघाचं मुख्यालय तरी कोरोनाचा कहर कसा? - राजू शेट्टी

कोल्हापूर, १३ जुलै : धारावीतील कोरोनामुक्तीचे श्रेय आरएसएसला देण्यात येत असल्याने राजू शेट्टी यांनी महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? तिथला कोरोना अटोक्यात का नाही.’ ते कोल्हापुरात बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, “धारावीत कोरोनाचा हाहाकार माजला होता, कोरोनामुळे किड्या मुंग्याप्रमाणे माणसं मरत होती, त्यावेळी आरएसएसचे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत, जीव धोक्यात घालून काम करत आहेत, असं एकही वृत्त वाचनात , पाहण्यात आलं नाही. मात्र WHO ने जेव्हा सांगितलं धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली, त्यावेळी अनेक जण श्रेय घेण्यासाठी पुढे आले. ते पुढे म्हणाले की, माझ्या मनात एक छोटीशी शंका आहे, RSS चं हेडक्वार्टर असलेल्या नागपुरातही कोरोनाचा हाहाकार आहे, तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही, कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इचलकरंजीत कोरोनाचा हाहाकार आहे, अनेक शहरात आहे. त्यामुळे संघस्वेयंसेवकांनी तिथे जावं, त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्तीचं काम करावं, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल.”
तत्पूर्वी, धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले होते.
ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत त्याचे कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टीवर टीका करायची नाही का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी ‘धारावी’ कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण या धारावीने कोरोनावर मात केली आहे. पण याचं श्रेय सरकारचं नसून राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचं आहे असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.
तसेच धारावीतील कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्र सरकारमुळे नाहीतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आल्याचं भाजपच्या नितेश राणे यांनी म्हटलं होतं.
News English Summary: Raju Shetty has raised an important question as the credit for the coronation in Dharavi is being given to the RSS. He said that if it was claimed that the team had liberated Dharavi Corona, then how could the Corona be destroyed in Nagpur, the headquarters of the team?
News English Title: The headquarters of the RSS in Nagpur then why corona not in control ask Raju Shetti News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON