18 April 2025 8:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

कोरोना आपत्ती | राज्यात ४ जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन तर नागपुरमध्ये आढळला नवा डबल स्ट्रेन

Maharashtra corona pandemic

कोल्हापूर, ०४ मे | राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यात सांगली, सातारा, बारामती आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात किराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेयरी, मिठाई आणि खाद्यपदार्थांची दुकानेही येत्या 7 दिवसांसाठी बंद राहणार आहे. हा लॉकडाऊन आज (मंगळवार) सकाळी सात वाजेपासून सुरु होणार असून 10 मे च्या रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

राज्याची उपराजधानी नागपुर शहरात कोरोना व्हायरसचे डबल म्यूटंट आढळले आहे. दरम्यान, दिल्लीहून मिळलेल्या अवहालानुसार, 74 सॅम्पलमधील 35 सॅम्पलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 5 नवे स्ट्रेन आढळल्याचे समोर आले आहेत. तर इतर 26 सॅम्पलमध्ये डबल म्यूटेशन असल्याचे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील मायक्रो बायोलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे यांनी सांगितले. विशेष म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप या स्ट्रेनचे नवीन लक्षण आहेत. हे सॅम्पल नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये आलेल्या संशयित रुग्णांचे असून एनआयव्ही पुणे आणि एनसीडीसी दिल्ली येथे तपासणी करीता पाठवण्यात आले होते.

गेल्या चोवीस तासांत सांगली जिल्ह्यात 1 हजार 568 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले असून यामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्याचे जलसंसाधन मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन घोषीत केला आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन एक व्हिडियो शेअर केला आहे.

 

News English Summary: The incidence of corona epidemic in the state is increasing rapidly. Against this backdrop, strict lockdown has been announced in four districts of the state. These include Sangli, Satara, Baramati and Ahmednagar districts.

News English Title: The lockdown has been announced in Sangli Satara Baramati and Ahmednagar districts news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या