19 April 2025 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

पतंजलीच्या 'कोरोनिल'ला महाराष्ट्रात बंदी..राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra government, banned, Baba Ramdev, Patanjali, drug Coronil

मुंबई, २५ जून : कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. जगात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जगात कोरोनावर ठोस कोणतेच औषध तयार करण्यात यश आलेले नाही. मात्र, योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावर औषध निर्माण केलेचा दावा करण्यात आला आहे. पंतजलीने कोरोनावर ‘कोरोनिल’ हे औषध तयार केले आहे. त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन हे औषध बाजारात आणले. मात्र, पंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे. त्याआधी या करोनावरील औषधांवर राजस्थान सरकारने बंदी होती.

करोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपीठानं हे औषध तयार केलं असून मंगळवारी ते लाँच करण्यात आलं. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारनं या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती, अशी धक्कादायक माहिती त्यानंतर समोर आली होती.

दरम्यान, उत्तराखंडच्या आयुर्वेद ड्रग्स लायसन्स प्राधिकरणाने पंतजलीच्या कोरोनिल औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. प्राधिकरणाचे उपनिर्देशक यतेंद्र सिंह रावत म्हणाले की, बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला कोरोनाचे औषध नव्हे तर इम्युनिटी बूस्टर आणि सर्दी-खोकल्याचं औषध म्हणून परवाना जारी केला होता. पतंजलीने कोरोनावर औषध आणल्याचा दावा केला असल्याचं मीडियातून समजलं असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

News English Summary: It is claimed that yoga guru Baba Ramdev’s Patanjali made medicine on corona. Patanjali has developed a drug called ‘Coronil’ on the corona. The drug was brought to the market by holding a press conference. The Maharashtra government has also banned the sale of this drug.

News English Title: The Maharashtra government has also banned the sale of Baba Ramdevs Patanjali made drug Coronil News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RamdevBaba(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या