मला लोकांना घाबरावायचे नाही, मात्र इंग्लंडमधला दुसरा लॉकडाऊन 92 दिवस लांबला होता - डॉ. संजय ओक

मुंबई, २० एप्रिल: राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र तरीही कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. गेल्या 24 तासांदरम्यान येथे 58,924 नवीन रुग्ण समोर आले आहेत. या दरम्यान 351 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यानंतर आता मानले जात आहे की, दिल्लीच्या धर्तीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात टोटल लॉकडाऊन लागू केले जाऊ शकते.
हे संकेत राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत या संदर्भात निर्णय घेऊ शकतात. ते म्हणाले, ‘आम्ही दिल्लीत 6 दिवसांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचा अभ्यास करत आहोत.’ आज ठाकरे सरकारमधील मंत्रिमंडळाचीही बैठक आहे. या बैठकीनंतर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
मंत्री म्हणाले, ‘संपूर्ण लॉकडाऊनचा सर्वात जास्त विरोध छोटे व्यापारी करत होते, मात्र आता ते आणि जीवनावश्यक वस्तुंचे दुकानदारही संपूर्ण लॉकडाऊनची मागणी करत आहेत. काही जिल्ह्यांमध्येही लॉकडाऊनची मागणी केली जात आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना याविषयी सांगितले आहे. ते लवकरच सर्वपक्षिय बैठक घेऊन याविषयावर चर्चा करतील. यानंतर संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले जाऊ शकते’ मंत्री छगन भुजबळ यांनीही संपूर्ण लॉकडाऊनवर जोर दिला आहे.
दरम्यान, राज्यातील नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करुन कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणला नाही तर महाराष्ट्रात दीर्घकाळ लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, अशी भीती कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी इंग्लंडचे उदाहरण दिले. इंग्लंडमध्ये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला दुसरी लाट आल्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला होता. मला लोकांना घाबरावायचे नाही. मात्र, इंग्लंडमधला हा लॉकडाऊन 92 दिवस लांबला होता. महाराष्ट्रावर तशी परिस्थिती येऊ नये म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणला पाहिजे, असे मत संजय ओक यांनी व्यक्त केले.
डॉ. संजय ओक यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्त या त्रिसूत्रीच्या जोरावरच कोरोनाची दुसरी लाट परतवता येणे शक्य असल्याचे सांगितले. नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले आणि वेगाने लसीकरण केले तर आपण लवकर यामधून बाहेर पडू. एप्रिल महिन्यातील शेवटचे तीन दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या तीन दिवसांतील रुग्णसंख्येवर लॉकडाऊन आणखी किती काळ लांबेल, हे निश्चित होईल, असे संजय ओक यांनी म्हटले.
News English Summary: A nationwide lockdown followed a second wave in England in early January. I don’t want to scare people. However, the lockdown in England was 92 days long. In order to prevent such a situation from happening in Maharashtra, the incidence of corona should be brought under control in time, said Sanjay Oak.
News English Title: The nationwide lockdown in England was extended for 92 days said state corona task force head Dr Sanjay Oak news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK