15 November 2024 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

राज्यात आज ८२४० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

Maharashtra, Corona Virus, Covid 19

मुंबई, २० जुलै : राज्यात आज ८२४० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३१८६९५ अशी झाली आहे. आज नवीन ५४६० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १७५०२९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १३१३३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, मुंबईपेक्षा ठाण्यात सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदांनी कंबर कसली आहे. कल्याण डोंबिवलीतही घरोघरी जाऊन कोरोनाबाधितांना ट्रेसिंग करण्यात येत असून येथे मनसेकडून धारावी पाटर्न राबवला जात असल्याचं म्हटलं जातंय.

दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या स्थितीवर विचार करण्यासाठी आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यात सर्व परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. हा लॉकडाऊन केव्हापासून आणि किती दिवसांचा व कसा असेल ते जिल्हाधिकारी ठरवतील, लवकरच त्याची नियमावली आम्ही जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं.

 

News English Summary: The number of corona patients in the state has increased to 8240 today and the total number is now 318695. Today a new 5460 corona infected patients have been cured. A total of 175029 patients have been cured and sent home from the hospital.

News English Title: The number of patients infected with corona in the state has increased to 8240 today in Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x