लॉकडाऊन की कडक निर्बंध? | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची फोन पे चर्चा
मुंबई, ४ एप्रिल: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातही कोरोनाचा प्रसार झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. रश्मी ठाकरे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे.यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंच्या तब्येतीबद्दल चौकशी केली आहे. तसेच राज्यातील वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे दोघेही कोरोनाबाधित आहेत. सद्यस्थितीत रश्मी ठाकरे यांच्यावर एच एन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? अशी विचारपूस केली.
तसेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार जो निर्णय घेईल, त्याबाबत विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितले. त्यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, असे बोललं जात आहे.
News English Summary: The prevalence of corona in Maharashtra is increasing rapidly. Even in the family of Chief Minister Uddhav Thackeray, corona spread. Chief Minister Uddhav Thackeray’s wife Rashmi Thackeray and son Aditya Thackeray contracted corona. It is learned that Leader of Opposition Devendra Fadnavis has called Uddhav Thackeray on the background that Rashmi Thackeray is currently undergoing treatment at the hospital. This time, he has inquired about Rashmi Thackeray’s health. The two are also reported to have discussed the growing corona situation in the state.
News English Title: The prevalence of corona in Maharashtra is increasing rapidly CM Uddhav Thackery discuss with Devendra Fadnavis news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS