23 December 2024 12:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

हाफकीनला लस निर्मितीसाठी मान्यता | मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश | राज्याच्या लोकसंख्येइतकी निर्मिती क्षमता

Bharat Biotech Covaxin, Halfkin Institute

मुंबई, १६ एप्रिल: भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ लस बनवण्यास केंद्र सरकारने राज्याच्या हाफकिन संस्थेस मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने ही लस बनवण्यास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व निर्धारित एक वर्षाच्या आत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

वैज्ञानिक तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून ‘कोव्हॅक्सिन बनवण्यास १ वर्षाचा कालावधी दिला आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरू करण्याचे नियोजन केले आहे. हाफकिनमार्फत एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत अंदाजे १२ कोटी ६० लाख लसी निर्माण करण्याची क्षमता आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी गुरूवारी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना परवानगी बाबत एक पत्र पाठवले आहे. “वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी” असे या पत्रात म्हटले आहे.

 

News English Summary: The state government has approved the state-owned Halfkin Institute to develop Bharat Biotech’s Covaxin vaccine. Chief Minister Uddhav Thackeray has thanked Prime Minister Narendra Modi, saying that with the permission of the Union government, large-scale vaccine production could start in Maharashtra.

News English Title: The state government has approved the state owned Halfkin Institute to develop Bharat Biotech Covaxin vaccine news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x