15 November 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

यूजीसीविरोधात विद्यार्थ्यांचं ई-मेल आंदोलन, तर परीक्षा न घेण्याचा निर्णयावर राज्य सरकार ठाम

UGC, Final Year Exams, Maharashtra Govt, Minister Uday Samant

मुंबई, १३ जुलै : महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा न घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. पण, यूजीसीने अंतिम वर्षाची सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. बीडमध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी समोर येऊन उघडपणे यूजीसीच्या निर्णयाविरोधात अनोखे आंदोलन केले आहे.

आज विद्यार्थ्यांनी राज्यभरात ई-मेल आंदोलन पुकारले आहे. राज्यातील २५ हजार विद्यार्थी घरूनच या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा विद्यार्थी कृती समितीने दावा केला आहे. परीक्षा धोरणाचा निषेध करण्यासाठी ई-मेल द्वारे प्रत्येक विद्यार्थी यूजीसीला निवेदन पाठवत आहे.

कोरोनाचं संकट महाराष्ट्रावर असल्याने तूर्तास राज्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे. इतर राज्यांशीही चर्चा केली जाणार आहे. विद्यापीठ परीक्षांबाबत न्यायालयात याचिका दाखल असल्याने वाट पाहणार अशीही भूमिका सरकारने घेतली आहे. दुपारी १ वाजता राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी विद्यापीठ अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत चर्चा झाली. त्यामध्ये ठाकरे सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. गुणवत्ता आणि भविष्यातील संधीसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन महत्त्वाचे असल्याचेही मंत्रालयाने म्हटलं आहे.

 

News English Summary: State Disaster Management Committee meeting was held at 1 pm at the Mantralaya. This time there was a discussion about the final year exams of the university. In it, it was decided that the Thackeray government would insist on not taking the exam.

News English Title: The State Government Is Adamant On Its Decision Not To Hold The Last Year Exam In The State News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x