22 December 2024 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

वाघाशी मैत्री केली जात नाही | वाघ ठरवतो मैत्री कधी करायची ते - संजय राऊत

MP Sanjay Raut

नाशिक, 10 जून | काल पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील असं म्हणाले की वाघाशी मैत्री करायला आम्ही कधीही तयार आहोत कारण दुश्मनी वाघाशी नव्हतीच. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप युतीसाठी जणून काही चंद्रकांत पाटलांनी ऑफरच दिली असं दिसून आलं. आज (१० जून) त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत पत्रकारांशी बोलत असताना असं म्हणाले की, वाघाशी मैत्री केली जात नाही. वाघ ठरवतो मैत्री कधी करायची ते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, आज चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छाही राऊतांनी दिल्या आहेत.

वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असं सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा. मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु. जरी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं, असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या चर्चा करताय, त्यानुसार जरी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली जातेय, पंतप्रधानाकडे यासंदर्भात काहीच नाही. मराठा समाज हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. राज्य सरकारकडून धूळफेक सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सवलती मराठा समाजाला दिल्यात त्या तरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं ते फक्त महाराष्ट्रात गेलं त्याला मोदी काय करणार असाही सवाल त्यांनी केला.

 

News English Summary: Speaking to reporters, Sanjay Raut said that friendship is not made with the tiger. The tiger decides when to make friends, says Sanjay Raut. Also, today is Chandrakant Patil’s birthday. Raut also wished him well.

News English Title: The tiger decides when to make friends said MP Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x