मी सिरमची लस घेतली | पण ती कोरोनाची नव्हे | पवारांचं स्पष्टीकरण

मुंबई, २ ऑक्टोबर : मी घेतलेली लस करोनाची नाही असं म्हणत सिरममध्ये जाऊन घेतलेल्या लशीवर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र मी आणि माझ्या स्टाफने घेतलेली लस ही करोनावरची नसून प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. कोविडवरची लस येण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत वेळ लागेल असं सिरमकडून सांगण्यात आल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. लोकांना वाटते की मी लस घेतली आहे. अशी चर्चा लोकांमध्ये खासगी असते की सिरमचे प्रमुख पवारांचे वर्ग मित्र आहे. त्यामुळे त्यांनी ती लस घेतली असेल असं लोक बोलतात. पण मी आणि माझ्या स्टाफने घेतली लस ही करोनावरची नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यात शरद पवार यांनी शुक्रवारी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले,मी व माझ्या सहकाऱ्यांनी लस घेतली आहे. मात्र, ती कोरोनावरची नाही तर रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. कोरोनावरची लस उपलब्ध होण्यासाठी अजून ३ ते चार महिन्यांचा काळ लागण्याची शक्यता आहे. कदाचित जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात ही लस मिळेल अशी माहिती सिरमकडून देण्यात असल्याचा आवर्जून उल्लेख यावेळी शरद पवार यांनी केला.
दरम्यान, उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे त्या तरुणीसोबत जो काही प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी असा आहे. पोलिसांकडून तिचा मृतदेह कुटुंबियांकडे न सोपवता परस्पर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील जनतेने यासारखी घटना आज प्रथमच पाहिली आहे. या सर्व प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने कायद्याला कवडीची किंमत दिली नाही हे अधोरेखित होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी व सांत्वन करण्यासाठी तिथे शांततेच्या मार्गाने चालले होते. खरंतर पीडित कुटुंबाची भेट घेऊ देण्यात पोलीस व सरकारला काहीच अडचण नव्हती. मात्र त्यांना जी काही वागणूक दिली गेली ती अशोभनीय व अतिशय चुकीची आहे.
News English Summary: NCP President Sharad Pawar has given an explanation on the corona vaccine I took in serum saying that the vaccine I took was not coronary. However, the vaccine taken by me and my staff is not for coronary but to increase immunity. Sharad Pawar has also clarified that it will take time till the end of January for vaccination against covid. People think I’ve been vaccinated.
News English Title: The Vaccine I Took Was Not From Corona Sharad Pawar Explanation On The Serum Vaccine Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC