30 December 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका Business Idea | गृहिणींसाठी कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असलेले टॉप 4 व्यवसाय, आजपासूनच सुरुवात करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATAPOWER NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: APOLLO
x

ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं कोरोनामुळे निधन

NCP corporator Mukund Keni, Covid 19, Corona Virus

ठाणे, १० जून : ठाण्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मुकुंद केणी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मुकुंद केणी हे ठाण्यातील गरजू लोकांना मदत करत होते. याच दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली. २७ मे रोजी ही बाब निदर्शनास आली. तेव्हापासून त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 9 जून रोजी रात्री त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे उपचारादरम्यान पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुकुंद केणी यांच्या निधनामुळे कार्यकर्ते, समर्थक आणि कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी कोरोनाचे १४५ रुग्ण वाढले होते. आतापर्यंत ठाण्यात कोरोनाचे ४३४३ रुग्ण आढळले असून १९४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ठाण्यात आतापर्यंत १२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २२६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

News English Summary: Outbreak of corona virus has been reported in Thane. The number of patients with coronary heart disease is increasing day by day. Similarly, senior NCP corporator Mukund Keni has passed away. They are being treated for coronary heart disease. However, he lost his life during the treatment.

News English Title: Then Senior NCP corporator Mukund Keni dies due to corona News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x