13 January 2025 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मग उद्धव ठाकरे पंढरपुरला तरी कशाला गेले? - दरेकर

CM Uddhav Thackeray, Pandharpur, Pravin Darekar

मुंबई, १९ जुलै : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला. शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर होते.

पवार म्हणाले, “कोरोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. कोरोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून कोरोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.”

दरम्यान, मोदी सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा प्रश्न शरद पवार विचारतात. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी पंढरपुरात जाऊन कोरोना नष्ट कर, असे गाऱ्हाणे विठुरायासमोर का मांडले, असा प्रतिप्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. तसेच सध्याच्या काळात आपल्या देव-देवतांच्या आशीर्वादाची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

News English Summary: Then why did Chief Minister Uddhav Thackeray go to Pandharpur and destroy Corona, why did he raise such grievances before Vithuraya? He also said that we need the blessings of our gods in the present times.

News English Title: Then why did Chief Minister Uddhav Thackeray go to Pandharpur said BJP Leader Pravin Darekar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#PravinDarekar(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x