22 November 2024 9:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

धक्कादायक! राज्यात नोव्हेंबर महिन्यात ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या

Shivsena, NCP, Congress, Farmers Suicide

मुंबई: नोव्हेंबरमध्ये सत्ता स्थापनेसाठी शह-काटशहाचा खेळ सुरू असताना राज्यात मात्र ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा हा आकडा सर्वाधिक असल्याचंही स्पष्ट झालं आहे. यापूर्वी २०१५मध्ये महिन्याभरात ३००हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं.

गतवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात १८६ तर नोव्हेंबर महिन्यात ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वात जास्त आत्महत्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात झाल्या आहेत. मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यात १२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं.

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे ७० टक्के पीक खराब झाले. मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक १२० आत्महत्या आणि विदर्भामध्ये ११२ आत्महत्यांची प्रकरणे घडली आहेत. २०१९ मध्ये एकूण २५३२ आत्महत्या झाल्या आहेत. तर २०१८ मध्ये हा आकडा २५१८ होता. यंदाच्या अतिवृष्टीमुळे जवळपास १ कोटी शेतकरी प्रभावित झाले आहेत. यापैकी ४४ लाख शेतकरी एकट्या मराठवाड्यातील आहेत.

 

Web Title:  Three hundred farmers committed suicide in Maharashtra in November month.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x