5 November 2024 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

दुःखद बातमी! कोरोनामुळे एकाच दिवशी पोलिस दलातील ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू

Covid 19, Pune, Mumbai

मुंबई/पुणे, २१ मे: सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशभरात राज्याचा कोरोनाच्या रुग्णसंख्येत पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिप्पट रुग्ण आहेत. तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल. बुधवारी संध्याकाळी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीत राज्यात दिवसभरात ६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यातले ४१ मुंबईतले,नवी मुंबईतले ३, उल्हासनगर २, पुण्यातले १३, पिंपरी चिंचवड २,औरंगाबाद – २, सोलापूर – २ असे रुग्ण दगावले आहेत. आज राज्यात २२५० रुग्णांचं नव्याने निदान झालं.

महाराष्ट्रात अक्षरश: थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे एकाच दिवशी तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे येथील तर दोन मुंबईतील आहेत.

मुंबई पोलिसमधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे यांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईतील पार्कसाइट पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले हेड कान्स्टेबल गणेश चौधरी (वय-57) यांची कोरोनामुळे मृत्यू झाला. दोन्ही अधिकारी ‘हाय-रिस्क एज-ग्रुप’मध्ये होते. त्यामुळे दोघे एप्रिलपासून रजेवर होते.

दुसरीकडे, पुण्यात कोरोनाने आणखी एका पोलिसाचा बळी घेतला आहे. खासगी रूग्णालयात उपचार सुरु असताना 42 वर्षीय पोलिसाचा मृत्यू झाला आहे. वाहतूक विभागात ते रूजू होते. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहेत.

 

News English Summary: In Maharashtra, three police officers have died in a single day due to infection with the corona virus. The whole of Maharashtra is shaken by this incident. Among the dead police personnel are one from Pune and two from Mumbai.

News English Title: Three police officer death due to covid 19 Mumbai and Pune Maharashtra Police News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x