23 February 2025 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कंगनाला भेट घ्यायला वेळ | मग कांदा उत्पादकांनाही वेळ द्या | शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut, Bhagat Singh Koshari, Onion Farmers Issue, Marathi News ABP Maza

नाशिक, १८ सप्टेंबर : केंद्र सरकारने कांद्यावर अन्यायकारक निर्यातबंदी लादून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. मोदी सरकार समाज माध्यमाचा मोठय़ा प्रमाणात आधार घेऊन देशभरातील शेतकरी, शेती विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेत आले. परंतु, सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी राहिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर, निर्यातबंदी विरोधात शनिवारपासून शेतकरी समाज माध्यमांवर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

ज्या प्रमाणे कंगनाची भेट घेतलात, त्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही भेट घ्या, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी संवेदनशील मनाचे आहेत. न्यायासाठी दाद मागणाऱ्यास ते नक्की भेट देतात, असं शेतकरी संघर्ष संघटनेने म्हटलं आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी यासंदर्भात निवेदन आणि सोशल मीडियातील एका व्हिडीओद्वारे आवाहन केले. १४ सप्टेंबरला अचानक केंद्राने कांदा निर्यातबंदीची भूमिका घेतली. या संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका सैनिकास भेट दिली होती. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध सिनेतारका कंगना राणौत हिचे मुंबईतील कार्यालय पालिकेने तोडल्याच्या तक्रारीवर तिलाही भेटले होते. इथे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने तर राज्यात लाखो शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे राज्यपाल मध्यस्थी करून शुक्रवारी आम्हाला ते नक्कीच भेट देतील’, अशा शब्दात शेतकरी संघर्ष संघटनेने कांदाप्रश्नी राज्यपालांच्या भेटीची मागणी केली आहे.

दरम्यान, टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांना कांदा सलग पाच ते सहा महिने ५०० ते ८०० रुपये क्विंटल दराने म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या दराने विकावा लागला होता. तेव्हा सरकारने कांद्याचे दर वाढण्यासाठी कोणती हालचाल केली नाही. परंतु, आता कांद्यावर दोन तासात निर्यात बंदी केली आहे. म्हणजे निर्यात बंदी करताना दोन तास आणि निर्यातबंदी हटविताना १५-१५ दिवस मुदत द्यायची, हा सरकारचा दुटप्पीपणा असल्याकडे संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लक्ष वेधले. कांदा उत्पादनात जगात भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

 

News English Summary: Farmers are now demanding to visit onion growers just like they visited Kangana. State Governor Bhagat Singh Koshyari is sensitive. The farmers’ struggle organization has said that they definitely visit those who ask for justice. Hansraj Wadghule, the founding president of the association, appealed in this regard through a statement and a video on social media.

News English Title: Time to visit Kangana Ranaut then meet the onion growers too farmers demand governor Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x