गेल्या २४ तासांत ९ हजार ८९५ नव्या रूग्णांची नोंद, २९८ रुग्णांचा मृत्यू
मुंबई, २३ जुलै : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल ९ हजार ८९५ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २९८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ४७ हजार ५०२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ६ हजार ४८४ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ९४ हजार २५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ % एवढे झाले आहे.
राज्यात आज 9895 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 347502 अशी झाली आहे. आज नवीन 6484 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 194253 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 140092 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 23, 2020
पुण्यात उद्यापासून म्हणजेच २४ जुलैपासून लॉकडाउन नसणार आहे. असं असलं तरीही निर्बंंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या कोविड १९ च्या नियंत्रणाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्देश लागू असतील असं पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. महानगर पालिकेा हद्दीत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा किंवा कारण वगळता रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बाहेर जाता येणार नाही. ६५ वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. २४ जुलैपासून पुढील आदेश मिळेपर्यंत हे आदेश कायम असणार आहेत.
News English Summary: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 347502. Today, newly 9895 patients have been tested as positive. Also newly 6484 patients have been cured today, totally 194253 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 140092.
News English Title: Today newly 9895 patients have been tested as positive News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON