22 December 2024 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीची भरपाई वाढीव दराने देण्याचा निर्णय | तर चंद्रपुरातील दारुबंदी उठवली

Mahavikas Aghadi

मुंबई, २७ मे | मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी कोकणाचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी तौक्ते चक्रीवादळात झालेल्या हाणीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच नुकसान भरपाई, मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई वाढीव दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चंद्रपूरमध्ये गेल्या काही वर्षांपासून दारुबंदी आहे. मात्र, याचा उलटा परिणाम दिसून आला आहे. दारुबंदीमुळे चंद्रपुरात अवैध दारुची विक्री आणि गुन्हेगारी फोफावली होती. हे रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांनी दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. मात्र, ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील काही काळापासून चंद्रपूरमधील दारुबंदी हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. यानंतरच हा निर्णय घेण्यात आलाय. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचा दावा राज्य सरकारने निर्णय घेताना केलाय.

 

News English Summary: The Chief Minister had visited Konkan a few days back. In it, he had inspected the damage caused by the cyclone. At the time, he had announced that compensation and assistance would be provided, similar to last year’s cyclone. However, in today’s cabinet meeting, it has been decided to compensate the damage caused by the cyclone at an increased rate.

News English Title: Today’s cabinet meeting Mahavikas Aghadi govt took many important decisions news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x