22 January 2025 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

अनिल परब यांच्या विरोधात न्यायालयात जाणार - नारायण राणे

Narayan Rane

मुंबई, २५ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थोबाडीत मारण्याबाबत वक्तव्य केले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गोंधळ सुरू झाला. राणे यांच्यावर चार शहरांत गुन्हे दाखल करण्यात आले. नाशिक पोलिसांनी तत्काळ राणेंना अटक केली. संतप्त शिवसैनिकांनी महाराष्ट्रातील 17 हून अधिक शहरांमध्ये निदर्शने केली आणि तोडफोड केली.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात न्यायालयात जाणार  – Union minister Narayan Rane will move to court against minister Anil Parab :

दरम्यान, राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबतची परब यांची एक व्हिडीओ क्लिपही समोर आली आहे. त्यावरुन राणे यांनी आता या प्रकरणात आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिलाय. त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात आता भाजप आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचं सरकार आहे त्यामुळे ते पोलिसांना मी कुठे आहे, याची माहिती देत मला अटक करण्याच्या सूचना देत आहेत. ते लोक दुसरं काही करू शकत नाहीत. आतापर्यंत मी एकटाच सगळ्यांना पुरून उरलोय,” असंही नारायण राणे म्हणाले.

अनिल परब यांच्या एका प्रकरणाची चौकशी सुरु आहे, त्याचाही आता पाठपुरावा सुरु राहील, असं राणेंनी म्हटलंय. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झालं. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. लोकशाही मार्गानं लढा देणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, अशा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहेत. फार सभ्य आहेत ना, काहीच करत नाहीत ना, आता जनतेला त्यांची करामत कळू द्या, अशा कडक शब्दात राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी / लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union minister Narayan Rane will move to court against minister Anil Parab.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x