17 April 2025 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

संकटकाळात आधी स्वत:चं कुटुंब, आर्थिक व्यवस्था आणि मग लोकांना मदत करा - गडकरी

Nitin Gadkari

नागपूर, ११ मे | राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षातील सहकार्त्यांना एक महत्वाचा आणि आपुलकीचा सल्ला दिला आहे. देशभरातील अनेक पक्षातील मंत्री, आमदार, खासदार तसेच नगरसेवकांनी कोरोना आपत्तीत स्वतःचा जीव गमावला आहे. लोकांना मदत करणं यात काही वावगं नसलं तरी त्यालाच अनुसरून गडकरांनी काही अग्रक्रम ठरवून दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

यावेळी पक्षातील सहकाऱ्यांशी संवाद साधताना नितीन गडकरी म्हणाले की, “माझी हात जोडून विनंती आहे…दौरे सांभाळून करा, स्वत:ला सांभाळा, कार्यकर्त्यांना जपा. पक्षाचे आधीच अनेक कार्यकर्ते आपण गमावले आहेत. आता आणखी गमावणे पक्षालाही परवडणारे नाही, अशा शब्दात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील भारतीय जनता पक्षातील नेत्यांना वडिलकीचा सल्ला दिला आहे.

शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करताना त्यांनी हा सल्ला देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आवर्जून उल्लेख केला. कार्यकर्ते जीव धोक्यात घालून मदत करीत असल्याबद्दल कौतुक करतानाच घ्यावयाच्या काळजीबद्दल ते आत्मीयतेने बोलले. “देवेंद्रजी आपण मध्यंतरी गडचिरोलीचा दौरा केला. असे दौरे करताना गाडीत किती लोक आहेत, याची काळजी घ्या. असा आढावा, रस्ते-पुलाची उद्घा‌टने व्हिडीओद्वारेही करता येतील”, असे गडकरी म्हणाले. संकटकाळात आधी स्वत:चा परिवार, कुटुंबाची आर्थिक व्यवस्था, मग समाज, पक्ष, लोकांना मदत, असा कामांचा क्रमही गडकरी यांनी आखून दिला.

साध्या साध्या मदतीचेही राजकीय श्रेय घेण्याची गरज नाही, अशा आशयाचा गडकरी यांचा सल्ला समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोर्ड, झेंडे नकोत, अशा कानपिचक्या दिल्याच्या प्रतिक्रिया आहेत. प्रत्यक्षात गडकरी म्हणाले की, आपण जे करतो ते लोकांना माहीत असते. सेवाकामाचा बागुलबुवा नको. राजकारण म्हणजे सत्ताकारण नव्हे तर समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण म्हणजे राजकारण.

 

News English Summary: Union Minister Nitin Gadkari, who is known to all as a personality beyond politics, has given an important and cordial advice to his Bharatiya Janata Party colleagues. Ministers, MLAs, MPs and corporators from many parties across the country have lost their lives in the Corona disaster. Although there is nothing wrong with helping people, it has been seen that Gadkar has set some priorities accordingly.

News English Title: Union Minister Nitin Gadkari gave suggestion to BJP party workers during corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या