27 December 2024 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 49 पैसे ते 85 पैशाचे 3 पेनी शेअर्स खरेदीला गर्दी, अप्पर सर्किट हिट, मालामाल करत आहेत - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | मल्टिबॅगर HUDCO सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: HUDCO Income Tax on Salary | 5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर, बजेटमध्ये घोषणा होणार EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC
x

लालदिव्यासाठी खडसेंनी प्रदेशाध्यक्षपद नाकारलं | त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं

Union state minister Raosaheb Danve, Eknath Khadses

मुंबई, २३ ऑक्टोबर: पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी ते नाकारलं. भविष्यात सत्ता येईल की नाही, असं नाथाभाऊंना वाटलं. त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं असावं, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला.

रावसाहेब दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला. नाथाभाऊ भाजप सोडून का गेले याला अनेक कारणे आहेत. कुठून सुरुवात करावी हा प्रश्न आहे. एकेकाळी भाजपमध्ये केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. पण भाजपची सत्ता येईल की नाही याची शंका असल्याने नाथाभाऊंनी तब्येतीचं कारण देत लालदिव्यासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडलं. त्यामुळे हे पद देवेंद्र फडणवीसांकडे आलं. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षालाच मुख्यमंत्री केलं जातं. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्याकाळात खडसेंनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं असतं तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रिपदावर दावा करता आला असता, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला.

मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने खडसे नाराज झाले होते. पण त्यांच्याकडे अर्ध्याहून अधिक महत्त्वाची खाती देण्यात आली. तरीही ते नाराज होते. त्यांनी फडणवीस सरकारशी जुळवून घेतले नाही. त्यांचे सरकारसोबत संबंध सुधारतील असं वाटत नव्हतं. नंतरच सर्व तुम्हाला माहीतच आहे, असं ते म्हणाले.

 

News English Summary: At one time, only Nathabhau had a red light in the party. At that time, he was offered the post of state president. But he denied it, citing health reasons. Nathabhau wondered whether he would come to power in the future. That is why he must have lost his chief ministership, said senior BJP leader Raosaheb Danve.

News English Title: Union state minister Raosaheb Danve reaction to Eknath Khadses resignation News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x