22 January 2025 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

कोरोना वाढत असताना २० हजार परप्रांतीय नागरिक पुन्हा मुंबई-पुण्यात परतले

Uttar Bhartiya, migrants

मुंबई, ८ जून: लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जीव वाचविण्यासाठी मिळेल त्या वाहनांनी गावाकडे गेलेले परप्रांतीय नागरिक महाराष्ट्रात पुन्हा परतू लागले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर परराज्यात गेलेले मजूर पुन्हा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात परतत आहेत. अवघ्या चार दिवसात परराज्यातून आलेल्या रेल्वेमधून अंदाजे २० हजार लोक महाराष्ट्रात परतले आहेत.

वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ०१०९४ क्रमांकाची रेल्वे काल ७ जूनला मुंबईत निर्धारित वेळेत पोहोचली. या रेल्वेने ५९४ प्रवासी मुंबईत आले. यापैकी १६३ कल्याण, १९८ ठाणे, २१० दादर आणि 23 प्रवासी सीएसएमटीवर उतरले. या स्थानकांवर संबंधित मनपा, जसे कल्याण डोंबिवली, ठाणे आणि बीएमसीने सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करुन, होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. ३ जून ते ७ जून या चार दिवसात जवळपास २० प्रवासी रेल्वेने मुंबई आणि उपनगरात आले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने आतापर्यंत ६० गाड्या सोडल्या. या विशेष रेल्वेमधून जवळपास २० हजार प्रवासी मुंबईत दाखल झाले. तर पुण्यात तीन रेल्वे दाखल झाल्या असून, तिथे १२०० प्रवासी उतरले.

ही आकडेवारी असली तरी काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी स्थलांतरिक मजूर अद्याप परतले नसल्याचा दावा केला आहे. हे मजूर लवकर परण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कारण लॉकडाऊननंतर मुंबईत पाऊस सुरू होईल, पावसात मजुरांना फारसे काम नसते. जे मजूर चालत गेले आहेत, ते काही काळ तेथे थांबून सर्व सुरळीत झाल्यानंतर शहरात दाखल होतील, असंही नसीम खान यांनी सांगितलं आहे. टीव्ही9 ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. दुसरीकडे मनसेने परप्रांतातून आलेल्या मजुरांची नोंद करुन ठेवण्याचं आवाहन केलं आहे. या सर्व मजुरांची माहिती पोलीस ठाण्यात असावी व कामगार कायद्यानुसार काम व्हावं, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

 

News English Summary: After the start of the lockdown, the foreigners who went to the village with the vehicles available to save their lives have started returning to Maharashtra. After the relaxation in the lockdown, the migrant workers are returning to Mumbai, Pune and Maharashtra.

News English Title: Uttar Bhartiya migrants come back to Mumbai Pune after lockdown News Latest Updates.Uttar Bhartiya migrants come back to Mumbai Pune after lockdown News Latest Updates

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x