5 January 2025 4:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त

Varun Sardesai

मुंबई, ०५ ऑगस्ट | शिवसेनेत सध्या स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राज्यात भारतीय जनता पक्ष वाढत असताना शिवसेना कधीच स्वतःचा मुख्यमंत्री बनवू शकणार नाही असं राजकीय तज्ञ वारंवार बोलून दाखवत. मात्र उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीनंतर एक धाडसी निर्णय घेतला आणि भाजपाने स्वप्नातही जे पाहिलं नसेल ते सत्यात उतरवलं आहे. काळानरूप धाडसी निर्णय घेणं हे एक मोठा सद्गुण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पाहत आहे.

दुसरीकडे युवासेना प्रमुख स्वतः राज्याचे पर्यावरण मंत्री झाल्याने त्यांना युवा सेनेच्या विस्तारासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचं शिवसेनेला वाटू लागलं आहे. मात्र शहर गावातील महिला सेनेप्रमाणे तरुणाईची शिवसेनेच्या प्रवासात मोठी भूमिका असते. आज आदित्य ठाकरे यांनी सुशिक्षित तरुणाई देखील युवासेनेच्या मार्फत शिवसेनेशी जोडली आहे आणि अजून पूढील टप्पा गाठण्याचे ठरविले असल्याचं वृत्त आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत कधीही कोणतीही निवडणूक न लढलेल्या उद्धव ठाकरेंकडे थेट मुख्यमंत्रिपदाची सूत्रं आहेत. त्यानंतर आता पक्षामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. पर्यावरण आणि पर्यटनमंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंकडे युवासेनेचीदेखील जबाबदारी आहे. आदित्य ठाकरेंकडे मंत्रिपद असल्यानं त्यांना युवासेनेसाठी फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे ते लवकरच युवासेनेचं प्रमुखपद सोडू शकतात. विशेष म्हणजे त्यांची जागा घेणारी व्यक्ती ठाकरे कुटुंबाबाहेरची असू शकते. यासाठी वरुण सरदेसाईंचं नाव आघाडीवर आहे.

युवासेनेत अनेक वर्षे काम केलेले वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेचं अध्यक्षपद जाऊ शकतं. वरुण हे आदित्य यांचे मावसभाऊ आहेत. युवासेनेचे सचिव म्हणून सध्या ते कार्यकत आहेत. पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. शिवसेनेसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे कामाला लागले आहेत. त्यातच मंत्रिपदाची जबाबदारीदेखील त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना युवासेनेसाठी पूर्ण वेळ देता येत नाही.

वरुण सरदेसाईंकडे युवासेनेचं प्रमुखपद गेल्यास ही घटना महत्त्वाची आहे. कारण युवासेनेचं प्रमुखपद आतापर्यंत कधीही ठाकरे कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला देण्यात आलेलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळे वेगळा पायंडा पडेल. सध्या वरुण सरदेसाई विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे युवासेनेची जबाबदारी त्यांच्याकडेच सोपवली जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Varun Sardesai may be appoint as Yuva Sena chief news updates.

हॅशटॅग्स

#VarunSardesai(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x