20 April 2025 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

तिहेरी तलाक: मोदींचं सुद्धा लग्न झाले आहे, मग मोदी का नांदत नाहीत? प्रकाश आंबेडकर

PM Narendra Modi, Prime minister Narendra Modi, Prakash Ambedkar, VBA, Vanchit bahujan Aghadi, Triple Talakh

मुंबई :  मोदी सरकारने काही बदल करून तिसऱ्यांदा लोकसभेत मांडलेले तिहेरी तलाक विधेयक या सभागृहामध्ये गुरुवारी ३०२ खासदारांनी पाठिंबा दिल्याने मंजूर झाले, तर विरोधात ७८ मते पडली. हे विधेयक आता राज्यसभेकडे संमतीसाठी पाठविण्यात येईल. या विधेयकाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांबरोबरच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू) नेदेखील जोरदार विरोध केला. या विधेयकाच्या निषेधार्थ जनता दल (यू)च्या खासदारांनी सभात्यागही केला.

केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही तशी शेकडो प्रकरणे देशात पुन्हा घडली आहेत. मुस्लिम महिलांचे संरक्षण करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आल्याचे ते म्हणाले. तिहेरी तलाक दिल्यास पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

या तरतुदीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असून त्यामुळे मुस्लीम महिलांचे नुकसान होणार असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. या विधेयकाला एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (सं)ने विरोध केला. राजीव रंजन सिंह यांनी, या विधेयकामुळे विशिष्ट समाजामध्ये अविश्वास निर्माण होण्याची भीती असल्याचा दावा केला. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

नरेंद्र मोदी सरकारसाठी महत्त्वाचे असणारे तिहेरी तलाकबंदी विधेयक गुरुवारी १७ व्या लोकसभेत ३०३ विरुद्ध ८२ मतांनी मंजूर झाले. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील लग्न झाले आहे, मग मोदी का नांदत नाहीत? असा सवाल आंबेडकर यांनी केला. नरेंद्र मोदी आपल्याला हुलकावणी देत आहेत. मात्र आपल्यावर त्यांचं थापेबाजीचं राजकारण थोपवण्याची जबाबदारी आहे. वंचितांना हलकेपणाची किंवा श्रेष्ठत्वाची भावना नेहमीच सत्तेपासून दूर ठेवत आली आहे. त्यामुळेच हलकेपणा आणि श्रेष्ठत्व सोडलं पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले.

दरम्यान लोकसभेत मंजूर झालेल्या तीन तलाख विधेयकाला एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रचंड विरोध केला होता . त्याआधी या विधेयकाबद्दल लोकसभेमध्ये बोलताना ओवेसी यांनी लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षावर सडकून टिका केली. मुस्लिम महिलांबद्दल तिहेरी तलाकच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करणाऱ्या मोदी सरकारला ओवेसींनी चांगलेच सुनावले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या