22 April 2025 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

जिंकलो नाही पण संपलो ही नाही: उदयनराजे भोसले

Satara loksabha by poll election 2019, Former MP Udayanraje Bhosale

साताराः विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारसभा झाल्या. पायाला जखमा असतानाही वयाच्या ८०व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले. साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची ही सभा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निर्णायक ठरली आहे आणि उदयनराजेंना पराभव पाहावा लागला.

राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा ८७,७१७ मतांनी पराभव केला, श्रीनिवास पाटील यांना ६३६६२० एवढी मतं मिळाली असून, भारतीय जनता पक्षाच्या उदयनराजेंना ५४८९०३ एवढं मताधिक्य मिळालं आहे. शरद पवारांनी या विजयावर सूचक प्रतिक्रिया दिली होती. मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला ही घोषणा यशस्वी ठरल्याचं सांगत पवारांनी सातारकरांचे आभार मानले. आता उदयनराजेंनीही पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलो ही नाही’, अशी भावनिक पोस्ट उदयनराजे भोसले यांनी लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केली आहे. तसेच ‘लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर’, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवरुन केली आहे. या केलेल्या पोस्टवरुन ते अधिकच भावनिक झाल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर सातारा जिल्हा चर्चेत राहिला. कारण भारतीय जनता पक्षाच्या मेगाभरतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे होणार्‍या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे प्रचंड मतांनी जिंकून येणार असा दावा भारतीय जनता पक्षाने केला होता. मात्र, भारतीय जनता पक्षाचा हा दावा साफ चुकीचा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात दाखल झालेले उदयनराजे भोसले यांना लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा फटका बसला आहे. कारण कॉलर उडवत स्टाईल दाखवणार्‍या उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्ह्यात अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी ८७ हजार ७१७ मतांनी पराभव केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या