22 January 2025 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

2017 मध्ये माझ्या घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरल्याचा विरारच्या बिझनेसमनचा परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप

Parambir Singh

मुंबई, ५ मे | विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आरोप केला आहे. 2017 मध्ये पोलिसांनी घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश दिल्याचा आरोप करणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंगही अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे परमबीर सिंग यांच्यावर होऊ लागलेल्या अनेक आरोपांचा कालावधी हा फडणवीसांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाच्या काळातील आणि त्यामुळे अनेक शंका उपस्थित होतं आहेत.

परमबीर सिंह यांच्यासह माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा, ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रारीचे सत्र सुरुच असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे दोन प्रकरणांत प्राथमिक चौकशी करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला आव्हान देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर केंद्रीय प्रशासकीय लवाद (कॅट) ही निर्णय घेऊ शकते, असे सकृतदर्शनी मत हायकोर्टाने मंगळवारी नोंदविले.

परमबीर सिंग यांनी याचिकेत ज्या मागण्या केल्या आहेत, त्या सेवेशी संबंधीत आहेत. त्यामुळे हे कॅटच्या अधिकारक्षेत्रात येते, असे न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने म्हटले. त्यावर सिंह यांच्यावतीने ॲड. सनी पुनामिया यांनी न्यायालयाला सांगितले की, ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी उपस्थित नसल्याने याचिकेवरील सुनावणी तहकूब करावी. या प्रकरणीही कॅटही सुनावणी घेऊ शकते. याचिकाकर्त्यांचे वकील सुनावणी तहकूब करण्याची मागणी करत आहेत. आम्ही सुनावणी तहकूब करू. परंतु, त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे हायकोर्टाने म्हटले.

 

News English Summary: Virar based businessman Mayuresh Raut has leveled allegations against former Mumbai Police Commissioner Parambir Singh. Raut has accused the police of robbing the house and stealing two vehicles in 2017. IPS officer Parambir Singh, who has accused former Home Minister Anil Deshmukh of ordering a Rs 100 crore ransom, is also likely to get into trouble.

News English Title: Virar based businessman Mayuresh Raut has leveled allegations against former Mumbai Police Commissioner Parambir Singh news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x