ती सुसाइड नोट बनावट | पार्थ पवार सुद्धा 'राजकीय आगीच्या' ट्विटवरून तोंडघशी

पुणे, ३ ऑक्टोबर : बीड तालुक्यातील केतूरा गावात राहणाऱ्या विवेक राहाडे या 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
यावेळी एक सुसाइड नोट आढळून समोर आली होती. यामध्ये ‘मी विवेक कल्याण राहाडे एक कष्टकरी आणि गरिब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जिवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी आताच नीट मेडिकलची परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्राव्हेटमध्ये शिकवण्याची ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलाची किंव येईल आणि माझे मरण सार्थक होईल’ असा मजकूर लिहिला होता. ही सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती.
पण पोलिसांनी या सुसाइड नोटचा नीट तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. ही सुसाइड विवेकने लिहिलीच नव्हती. विवेकच्या मृत्यूचा फायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार करून ती सोशल मीडियाद्वारे व्हायरल करण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे नीट परीक्षेत माझा नंबर लागत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे विवेक राहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, त्या मजकुरातील अक्षर विवेकचे नसल्याचा अहवाल औरंगाबाद येथील हस्ताक्षर तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे ही चिठ्ठी बनावट असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सामाजिक शांतता भंग करणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळं विवेक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे.
दरम्यान याच घटनेच्या अनुषंगानं पार्थ पवार यांनी ट्वीट केलं होतं. “मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि लढावं. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी विनंती आहे,” असं पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचा आणि त्याने लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला होता. पुढे त्यांनी म्हटलं होते की, “विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही”. मात्र सदर नोट खोटी निघाल्याने पार्थ पवारांची अतिघाई त्यांच्या राजकीय स्टंटमध्ये परिवर्तीत झाली आहे हे नक्की म्हणावं लागेल.
Devastated to hear of the tragic death of Vivek who committed suicide for the cause of Maratha reservations. Before a chain reaction of such unfortunate incident starts, Maratha leaders have to wake up & fight for this cause. Requesting Maha govt to step in to solve the crisis. pic.twitter.com/r8c3YQUoO0
— Parth Pawar (@parthajitpawar) September 30, 2020
News English Summary: ‘‘Devastated to hear of the tragic death of Vivek, who committed suicide for the cause of Maratha reservation. To avert a chain reaction of such unfortunate incidents, Maratha leaders have to wake up and fight for this cause. Requesting Maharashtra Government to step in to solve the crisis,’’ he tweeted. ‘‘The flame that Vivek has ignited in our minds can set the whole system ablaze.
News English Title: Vivek Rahades suicide case and Parth Pawar twitt on Maratha Reservation Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल