23 December 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
x

वोडाफोन-आयडिया नेटवर्कच्या कांड्या गुल | लाखो ग्राहक नाॅट रिचेबल

Vodafone idea, network down, Maharashtra

मुंबई, १५ ऑक्टोबर : देशातील आघाडीची मोबाईल सेवा पुरवठादार असलेल्या वोडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ढेपाळले आहे. पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडाने राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये ग्राहकांना Vi च्या कनेक्टिव्हिटी फेल्युअरचा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर ग्राहकांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात कालपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच सकाळपासून नेटवर्क गेल्याने व्होडाफोन- आयडीयाची नवीन नावाची कंपनी व्हीआयचे नेटवर्क गेल्याचा अनुभव अनेकांना आला. पुण्यातील काही जुन्या आयडिया ग्राहकांना अर्ध्या तासापूर्वी रेंज आली आहे. मात्र, त्यामध्ये इंटरनेट वेग आणि नेटवर्कमध्ये ताकद नसल्याचे या ग्राहकांनी सांगितले.

पुण्यातील काही ग्राहकांनी कालपासूनच कंपनीकडे तक्रार केल्या आहेत. मात्र, त्यांना कंपनीने लवकरच सुरु केले जाईल, तांत्रिक अडचण असल्याचे उत्तर दिले आहे. मात्र, आज दुपारपर्यंत त्या ग्राहकांना नेटवर्कची वाट पहावी लागली आहे. पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. याचबरोबर अमरावतीयेथील आयडिया ग्राहकांना देखील कालपासून रेंजची समस्या जाणवू लागली आहे.

याबाबत Vi च्या ग्राहकांनी सोशल मीडियावर कंपनीबाबत पोलखोल केली. नेटवर्क नसल्याने ग्राहकांना कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी देखील संपर्क करणे अवघड बनले आहे. काहींनी ट्विटरवर Vi च्या नेटवर्कबाबत तीव्र नाराज व्यक्त केली आहे. यामुळे ट्विटरवर वोडाफोन टॉप ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

 

News English Summary: Vodafone Idea users in Maharashtra took to Twitter on Thursday morning complaining of connectivity issues. Users in parts of Maharashtra, primarily Pune, complained of network issues with their Vodafone Idea number. “No network signal on Vi since last night. Just spoke to the customer care and the person informed there is outage in Maharashtra due to yesterday’s rain and it may take 6 more hours to fix it,” tweeted a Vi user.

News English Title: Vodafone idea network down in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x