23 February 2025 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

जनतेसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायलाही तयार | पण लोकांना ऑक्सिजन उपलब्ध करून द्या - आरोग्यमंत्री

Maharashtra Oxygen supply

मुंबई, २२ एप्रिल: देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते.

दरम्यान, देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना अनेक भागांमधून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या असताना महाराष्ट्रात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचे प्राण गेल्याची घटना घडली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट केंद्र सरकारला साकडं घातलं आहे. “राज्य सराकर सर्व प्रकारे अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे.

 

News English Summary: The state government is ready to make a humble request in every possible way, ready to lay the foundation. The state government is ready to do anything for the people of the state. Oxygen availability quota allocation is with the Central Government. We have requested the Central Government to provide more and make oxygen available in Maharashtra through Green Corridor.

News English Title: We are to do anything to get oxygen supply in Maharashtra from central govt news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x